Hardik Joshi Post: राणादाने पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडिओ केला शेअर, अन् म्हणाला ‘माझ्या आयुष्यात…’

Hardik Joshi Post: ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala ) या सिरीयलमधून प्रत्येकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणून हार्दिक जोशी- अक्षया देवधरला (hardeek joshi akshaya deodhar) ओळखले जाते. म्हणजेच आपल्या राणादा आणि पाठकबाईं हे दोघेही २ डिसेंबर २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाचे (Marriage) अनेक फोटो आणि व्हिडीओही आजून देखील सोशल मीडियावर (Social media) […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 03T160556.122

Hardik Joshi Post

Hardik Joshi Post: ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala ) या सिरीयलमधून प्रत्येकांच्या घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणून हार्दिक जोशी- अक्षया देवधरला (hardeek joshi akshaya deodhar) ओळखले जाते. म्हणजेच आपल्या राणादा आणि पाठकबाईं हे दोघेही २ डिसेंबर २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या लग्नाचे (Marriage) अनेक फोटो आणि व्हिडीओही आजून देखील सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत असतात.


तसेच आज हार्दिक आणि अक्षयाचा साखरपुडा होऊन १ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने त्याने पाठकबाईंसाठी एक खास पोस्ट केली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या सिरियलमधून चाहत्यांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही सतत जोरदार चर्चेत असतात.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने ३ मे २०२२ रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर साखरपुडा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याला १ आज वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने हार्दिकने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया हार्दिकला अंगठी घालत असल्याचे दिसून येत आहे. तसेच हार्दिक अक्षयाला रोमँटिक पद्धतीने प्रपोज करत अंगठी घालत असल्याचे दिसून येत आहे.

Bhaurao Karhade: मोठी बातमी! ‘माफ करा ‘TDM’ प्रदर्शन थांबवतोय’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेंचा मोठा निर्णय

तसेच “माझी जवळची मैत्रीण, माझं प्रेम, तू नेहमीच होतीस, माझ्या आयुष्यात सर्वात आनंदाचा क्षण. साखरपुड्याच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा”, असे हार्दिकने कॅप्शन लिहिले आहे. दरम्यान अक्षया आणि हार्दिकच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे सर्वच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

गेल्या काही महिन्याअगोदर हार्दिकने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करण्याविषयीचे कारण सांगितले आहे. अक्षयाला तिच्या वाढदिवशी साखरपुडा करायचा होता. तिचा जन्म अक्षय्य तृतीयाचा आहे. म्हणून मग ३ मे रोजी साखरपुडा करण्यात आला होता, असे हार्दिकने त्यावेळी सांगितले होते.

Exit mobile version