Download App

War 2: अ‍ॅक्शन सीन्सचा थरार अन्…; हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ सिनेमा ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

War 2 Release Date Out : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर यांचा ‘वॉर 2’ (War 2 Movie) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते खूपच उत्सुक झाल्याचे बघायला मिळत आहेत. आता या सिनेमाची रिलीज डेट ( Release Date) जाहीर आली आहे.


‘वॉर 2’ या सिनेमाची रिलीज डेट आता जाहीर झाली आहे. त्यामुळे चाहत्यांची मोठी उत्सुकता आणखीचं वाढली आहे. ‘वॉर’नंतर चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. आता ‘वॉर 2’ या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमासाठी चाहत्यांना अनेक दिवस वाट बघावी लागणार आहे.

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या बहुचर्चित ‘वॉर 2’ या सिनेमाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. वायआरएफ स्पाय यूनिवर्सचा हा सहावा सिनेमा असणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा 14 ऑगस्ट 2025 दिवशी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.15 ऑगस्टला या सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर बोलबाला बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘वॉर’ हा सिनेमा 2019 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला कमावला आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळाले होते.

Animal : ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील ‘या’ 5 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री

गेल्या काही दिवसांपासून ‘वॉर 2’ या बहुचर्चित सिनेमामध्ये कियारा आडवाणी झळकणार असल्याची माहिती समोर आली होती. यशराजच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. यशराजने आजपर्यंत ‘एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाणसारखे ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केल्याचे बघायला मिळाले आहे.

‘वॉर 2’ या अॅक्शनचा तडका असलेल्या सिनेमात चाहत्यांना हृतिक आणि ज्युनियर एनटीआरचा अॅक्शन मोड बघायला मिळणार आहे. या पॅन इंडिया सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. ‘वॉर’प्रमाणे ‘वॉर 2’ हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us