Animal : ‘अॅनिमल’ चित्रपटातील ‘या’ 5 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने लावली कात्री
Ranbir Kapoor Animal Update: रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) मोस्ट अवेटेड सिनेमा ‘अॅनिमल’ ( Animal Movie) 1 डिसेंबरला रिलीजसाठी सज्ज झाला आहे. संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून (Censor Board) ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे. यामुळे आता अॅनिमलला रिलीजपूर्वी काही बदल करावे लागणार आहेत. ‘अॅनिमल’ला सिनेमाला दिलेले CBFC प्रमाणपत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, यामध्ये बोर्डाने ‘अॅनिमल’मध्ये 5 बदल सुचवले आहेत.
View this post on Instagram
मिळालेल्या माहितीनुसार, ‘अॅनिमल’च्या निर्मात्यांना विजय आणि झोयाचे ‘म्हणजेच रणबीर-रश्मिकाचे अनेक किसिंग सीन्स होते. पण आता सिनेमातील या दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. रणबीर कपूरने विजयची भूमिका साकारली आहे आणि रश्मिका मंदान्नाने झोयाची भूमिका साकारली आहे. इंटिमेट सीननंतर सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटातील ‘वस्त्र’ शब्दाच्या ठिकाणी ‘पोशाख’ हा शब्द वापरण्याचा सूचना दिल्या आहे.
CBFC ने निर्मात्यांना सिनेमातील आणखी काही ओळी आणि सबटायटल्स बदलण्याची सूचना केली आहे. शिवाय शपथेचे शब्द काढून टाकण्याचेही सांगण्यात आले आहे. ‘अॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत आधीच स्पष्ट केले होते की, हा चित्रपट प्रौढांसाठी आहे आणि त्यामुळेच ते आपल्या मुलाला ‘अॅनिमल’ पाहण्यासाठी घेऊन जाऊ शकणार नाहीत.
Pooja Sawant Engaged: पूजा सावंतचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण आहे तरी कोण? जाणून घ्या
अॅनिमल हा सिनेमा वडील आणि मुलाच्या रंजक अशा नात्याची कथा आहे. चित्रपटात अनिल कपूरने रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका केली आहे, तर रश्मिका मंदान्ना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली आहे. शिवाय या चित्रपटात बॉबी देओलचीही महत्त्वाची भूमिका आहे. हिंदीसोबतच तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.