Download App

Akshay Kumar ने मला जीवे मारण्याची सुपारी दिली; ‘या’ अभिनेत्याने केला खळबळजनक दावा

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. कधी त्याचे चित्रपट, कधी त्याचा फिटनेस तर कधी राजकीय वलय देखील त्याच्याभोवती निर्माण होत असतं. मात्र यावेळी तो एका धक्कादायक गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ती गोष्ट म्हणजे त्याने एका अभिनेत्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा दावा संबंधित अभिनेत्याकडून करण्यात आला आहे. या अभिनेत्याचं नाव आहे. कमाल आर खान ज्याला केआरके या नावाने ओळखलं जातं. ( Actor Kamal R Khan claim Akshay Kumar gave Contract for Killing to him )

Bigg Boss OTT : ‘जनता हैं असली बॉस’, सलमान खानने गायलं बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग

कमाल आर खान देखील सोशल मिडीयावर कायमच चर्चेत असतो. तो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हिंदी चित्रपटांबाबत भाष्य करत असतो. त्याच्या या ट्विटमुळे तो वादामध्ये देखील सापडत असतो. असंच एक धक्कादायक आरोप करणारं ट्विट कमाल आर खानने केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने अक्षय कुमारने आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे. असा दावा केला आहे.

त्याच्या या दाव्याने चर्चांना उधाण आले आहे. केआरकेने ट्विट केलं आहे या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की, ‘अक्षय कुमार सोडून माझे बॉलिवूडमध्ये सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. त्याने मला तुरूंगात असताना जीवे मारण्याची सुपारी दिली होती. मी भाग्यावान होतो म्हणून वाचलो. तो मला पुन्हा पोलीस ठाण्यात किंवा जेलमध्ये मारण्याची सुपारी देत आहे. मला काही झाले तर त्याला अक्षय कुमार जबाबदार असेल.’

या पोस्टनंतर कमाल खानला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. तसेच त्याने पुढे आणखी काही ट्विट केले आहेत ज्यामध्ये तो म्हणत आहे की, अक्षय कुमारचे 10 चित्रपट एकापाठोपाठ एक फ्लॉप ठरले आहेत. तसेच त्याचा आगामी ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपटही फ्लॉप ठरणार आहे.

Bloody Daddy : बॉलिवूड स्वतः च्या ऱ्हासाचा सोहळा करतयं; शाहिदच्या चित्रपटावरून विवेक अग्निहोत्रींचा टोला

दरम्यान 2012 मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट अत्यंत गाजला होता. या यशस्वी चित्रपटाच्या 11 11 ऑगस्ट 2023 ला वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ‘ओह माय गॉड’ मध्ये अक्षयने भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता ‘ओह माय गॉड 2’ मध्ये तो भगवान शिवाच्या अवतारात दिसणार आहे.

Tags

follow us