Bloody Daddy : बॉलिवूड स्वतः च्या ऱ्हासाचा सोहळा करतयं; शाहिदच्या चित्रपटावरून विवेक अग्निहोत्रींचा टोला

Bloody Daddy : बॉलिवूड स्वतः च्या ऱ्हासाचा सोहळा करतयं;  शाहिदच्या चित्रपटावरून विवेक अग्निहोत्रींचा टोला

Vivek Agnihotri on Bloody Daddy : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे (Bollywood) अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) मोफत रिलीज करण्यात आले आहेत. त्यामध्ये आता अभिनेता शाहीद कपूरचा (Shahid Kapoor) ब्लडी डॅडी हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत रिलीज करण्यात आला आहे. आज 9 जून ला हा चित्रपट जिओ सिनेमावर (Jio Cinema) रिलीज करण्यात आला आहे. त्यावर द कश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. (Bollywood is celebrating its own destruction says Vivek Agnihotri on Shahid Kapoors Bloody Dady)

Jockey Shroff च्या पत्नीची पोलिसांत धाव, Tiger Shroff च्या कंपनीची फसवणुक झाल्याचा दावा…

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर द्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, 200 कोटींचा चित्रपट कोणी फुकट का दाखवावा हे एक वेडेपणाचे बिझिनेस मॉडेल आहे. त्यामुळे बॉलिवूडचा ऱ्हास होत आहे. तर दुसरीकडे वाईट बातमी ही आहे की, बॉलिवूड स्वतः च्या ऱ्हासाचा सोहळा साजरा करतयं. अशी टीका दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडवर केली आहे.

पालकांनो सावधान! इन्स्टाग्राम बनले लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा अड्डा; टास्क फोर्स करणार तपास

दरम्यान यावर शाहीद कपूरचा चित्रपट ब्लडी डॅडीचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘सुल्तान’, ‘एक था टाइगर’ यासांरख्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. ते म्हणाले की, त्यांनी सांगितलं की, हा बिग बजेट ओटीटी चित्रपट असून त्याची कथा अशी लिहिण्यात आली आहे की, ती पुढे वाढवता येऊ शकते.

तसेच ते पुढे असं देखील म्हणाले की, इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाच्या बजेटमध्ये देखील काही कमी करण्यात आलेले नाही मात्र निर्मात्यांना तो एक बिग बजेट ओटीटी चित्रपट वाटतोय त्यामुळे त्याची कथा अशी लिहिण्यात आली आहे की, ती पुढे वाढवता येऊ शकते. तर यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत की, हे बिझिनेस नाही तर जिओ चे बिझिनेस मॉडेल आहे. सुरूवातीला ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी गोष्टी फ्री द्यायच्या नंतर त्याचे पैसे आकारायचे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube