Jockey Shroff च्या पत्नीची पोलिसांत धाव, Tiger Shroff च्या कंपनीची फसवणुक झाल्याचा दावा…
Jockey Shroff : अभिनेता जॅकी श्रॉफची (Jockey Shroff) पत्नी आयशा श्रॉफने (Aisha Shroff) पोलिस ठाण्यात एक तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या 58.53 लाख रूपायांची फसवणुक झाल्याचा आरोप केला आहे. सांताक्रुज पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून ज्या व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच नाव अॅलन फर्नांडिस असं आहे. (Jockey Shroffs Wife Aisha Shroff Filed a case of Fraud against employee of Tiger Shroffs company )
प्रकरण नेमकं काय?
जॅकी श्रॉफच्या पत्नीने आरोपी अॅलन फर्नांडिस याची त्यांच्या एमएमए मट्रीक्स कंपनीमध्ये 20 नोव्हेंबर 2018 ला डायरेक्टर ऑफ ऑपरेशन म्हणून नियुक्ती केली होती. एमएमए मट्रीक्स जीम ही टायगर श्रॉफची असून तो कामात व्यस्त असल्याने त्याची आई आयशा श्रॉफच या जीमचा कारभार पाहतात.
Vitthal Maza Sobati: भक्तिरसात तल्लीन करणारा ‘विठ्ठल माझा सोबती’
दरम्यान या प्रकरणाबद्दल पोलिसांनी अशी माहिती दिली की, आरोपी अॅलन फर्नांडिस याला या टायगर श्रॉफच्या जीममध्ये आयशा श्रॉफ यांनी तब्बल 3 लाखांच्या मासिक वेतनावर जीममध्ये येणाऱ्या लोकांना मार्षल आर्टचे प्रशिक्षण देण्यासाठी ठेवले होते. मात्र त्याने जीममध्ये येणाऱ्या लोकांची फी ची तब्बल 58.53,591 एवढी रक्कम ही कंपनीच्या बॅंक खात्यावर न टाकता त्याने ती थेट आपल्या आयसीआयसीआय बॅंकेच्या खात्यावर ठेवली. तसेच काही रक्कम त्याने रोख देखील घेतली आहे.
Zeenat Aman: 70- 80चं दशक गाजवणाऱ्या झीनत अमानने इन्स्टाग्रामवर पेटवलं रान !
त्याचबरोबर या आरोपीने श्रॉफ यांच्या कंपनीकडून भारतात आणि भारताबाहेर आयोजित करण्यात येणाऱ्या एकुण 11 स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी ज्यादा रक्कम घेतली. असल्याच देखील सांगण्यात येत आहे. तसेच कंपनीच्या नावे बनावट लेटर हेड तयार करून त्यावर स्वाक्षऱ्या करून तो त्याच्या फायद्यासाठी वापरत होता.
अभिनेता जॅकी श्रॉफच्या पत्नी आयशा श्रॉफ या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या त्यांचे आणि जॅकी श्रॉफचे फोटो शेअर कर असतात. तर त्यांचा मुलगा म्हणजे टायगर श्रॉफ हा बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. तो त्याचा फिटनेस आणि डान्ससाठी नेहमी चर्चेत असतो. त्याने हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.