Zeenat Aman: 70- 80चं दशक गाजवणाऱ्या झीनत अमानने इन्स्टाग्रामवर पेटवलं रान !

Zeenat Aman: 70- 80चं दशक गाजवणाऱ्या झीनत अमानने इन्स्टाग्रामवर पेटवलं रान !

Zeenat Aman: 70 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री झीनत अमान (zeenat aman) यांनी भलेही मोठ्या पडद्यापासून अंतर ठेवले असेल, (Zeenat Aman instagram pictures) परंतु त्यांचे दिसणे, बोलणे आजही चाहत्यांना आवडते. (zeenat aman bikini photos) त्या काळात झीनत अमान यांचा अभिनय तर आवडलाच पण त्यांची स्टाइल स्टेटमेंटही चर्चेत होती. (zeenat aman satyam shivam sundaram) झीनत या अभिनेत्री होत्या जिने बॉलीवूडमध्ये हिप्पी ट्रेंड आणि रेट्रो लुकची सुरुवात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zeenat Aman (@thezeenataman)


झीनत अमानने 1970 मध्ये ‘द एविल विदीन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्याने ‘हलचल’, ‘हरे राम हरे कृष्णा’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’ सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटातील ‘रूपा’ या त्याच्या बोल्ड अवताराचे खूप कौतुक झाले असले आणि तरीही लोक त्या चित्रपटाबद्दल बोल्याशिवाय राहत नाहीत.

झीनत अमानने नुकतेच इन्स्टाग्रामवर पदार्पण केले आहे. झीनत अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 8 जून रोजी तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटातील स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये झीनत ही जमिनीवर झोपली असल्याचे दिसून आली आहे. हिरव्या आणि लाल बांधणी प्रिंटच्या साडीमध्ये झीनत खूपच ग्लॅमर दिसून येत आहे. या फोटोमध्ये ती अतिशय हलक्या मेकअपमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करत असताना तिने लिहिले आहे की “हे गरम आहे, गरम आहे, गरम आहे… उष्णता अशा प्रकारे मारली जाऊ शकते, अशा प्रकारचे कॅप्शन या फोटोला दिला आहे.

TDM Review : गावातील राजकारण, घरातली बेताची परिस्थिती; नवोदीत कलाकारांनी वेधलं लक्ष

झीनत अमानने स्वतःचे फोटो पोस्ट करताच, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. या चित्रपटातील झीनतच्या अभिनयाचेही लोकांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे. एका यूजरने ‘बॉलिवुडमध्ये आतापर्यंत- कोणीही तुम्हाला मागे सोडू शकत नाही. आत्तापर्यंतची सर्वात प्रसिद्ध हॉट अभिनेत्री. अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या पण तरीही तू सर्वोत्कृष्ट आहेस. तर दुसर्‍या यूजरने लिहिले आहे की, रुपा एक सुंदर आणि धाडसी महिला होती. तसेच झीनत अनेकदा तिच्या फोटोशूट किंवा तिच्या जुन्या चित्रपटांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. विशेष म्हणजे ‘सत्यम शिवम सुंदरम’ची निर्मिती राज कपूर यांनी केली होती आणि झीनत अमानसोबत शशी कपूर मुख्य भूमिकेत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube