पालकांनो सावधान! इन्स्टाग्राम बनले लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा अड्डा; टास्क फोर्स करणार तपास
Instagram News : आज जगभरात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच विविध सोशल मीडिया (social media) प्लॅटफॉर्मने अक्षरक्षः वेडं लावलं आहे. जगात थोरा मोठ्यांपासून अनेकजण त्यांचा अतिशय मैल्यवान वेळ सोशल मीडियावर घालवत असल्याचे विदारक चित्र आहे. अशातच आता तरूणांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या इन्टाग्रामबाबत (Instagram) एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. एका अभ्यासातून हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. यात इन्टाग्राम हे लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा अड्डा बनल्याचे नमुद करण्यात आले आहे. (Instagram Platform For Child Physically Abuse Network )
Odisha Train Accident : बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर शवगृह बनलेल्या ‘त्या’ शाळांवर हातोडा
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आणि वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, बाल लैंगिक शोषणासाठी प्रचार आणि विक्रीसाठी पीडोफाइल नेटवर्कद्वारे Instagram हे मुख्य व्यासपीठ बनल्याचे या अहवालातून समोर आले आहे. यूएस युनिव्हर्सिटीच्या सायबर पॉलिसी सेंटरच्या संशोधकांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांद्वारे चालवल्या जाणार्या खात्यांचे मोठे नेटवर्क विक्रीसाठी स्वयं-निर्मित बाल लैंगिक शोषण सामग्रीची खुलेआम जाहिरात करत आहेत.
Kajol : ‘आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे’ म्हणत काजोलनं उचललं मोठं पाऊल !
जर्नलनुसार, इन्टा यूजर्स विशिष्ट कीवर्ड आणि श्रेणीशी संबंधित हॅशटॅग शोधून चाइल्ड इन्टाग्रामवर पॉर्न शोधू शकतात असा धक्कादायक खुलासादेखील यात करण्यात आला आहे. याच माध्यमातून संबंधित व्यक्ती यूजर्सना अल्पवयीन मुलांचा समावेश असलेली लैंगिक सामग्री विकली जाते अशा प्रकारच्या अकाउंटकडे आकर्षित करते. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व खाती स्वतःचं चालवत असल्याचे म्हटले आहे. टेस्ला आणि ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही हा अहवाल शेअर केला असून, याला अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
https://letsupp.com/national/gujarat-high-court-on-17-years-old-girl-abortion-manusmriti-55749.html
टास्क फोर्सची निर्मिती
समोर आलेल्या या धक्कादायक माहितीनंतर सोशल मीडिया जायंटने त्यांच्या सुरक्षा सेवांमधील समस्या मान्य केल्या असून, समस्यांचे निराकरण करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. इन्टाग्राम विरोधात यापूर्वीही खासगी गोष्टी उघडपणे शेअर केल्याबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत.