Bigg Boss OTT : ‘जनता हैं असली बॉस’, सलमान खानने गायलं बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग

Bigg Boss OTT : ‘जनता हैं असली बॉस’, सलमान खानने गायलं बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग

Bigg Boss OTT : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा टीव्हीवरील बिग बॉस (Bigg Boss) शो चाहत्यांनी डोक्यावर घेतल्यानंतर 2020 मध्ये बिग बॉस ओटीटीची (Bigg Boss OTT) सुरूवात करण्यात आली होती. या शोमध्ये अनेक कंटेस्टेंटने भाग घेतला. चांगला परफॉर्म्सही केला मात्र याच्या पहिल्या सीझनचं सुत्रसंचालन सलमानने नाही तर करण जौहरने केलं होतं. यावेळी सलमान खानच बिग बॉस ओटीटीचं सुत्रसंचालन करणार आहे. हा सीझन खास बनवण्यचे प्रयत्न सुरू असून नुकताच सलमानने या सीझनचं अॅंथम सॉन्ग गायलं आहे. ( Salaman Khan Sung a Bigg Boss OTT anthem song )

सलमान खानने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग गाताना दिसत आहे. हे अॅंथम सॉन्ग अत्यंत एनर्जेटीक आहे. या ट्विटमध्ये सलमानने बिग बॉस ओटीटीचा दुसरा सीजन कधी येणार आहे. त्याबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. तसेच हे गाणे गाताना तो उत्साहात डान्स करताना दिसला आहे.

Bloody Daddy : बॉलिवूड स्वतः च्या ऱ्हासाचा सोहळा करतयं; शाहिदच्या चित्रपटावरून विवेक अग्निहोत्रींचा टोला

सलमान या कॅप्शनमध्ये म्हटला आहे की, मी घेऊन आलो आहे. बिग बॉस ओटीटीचं अॅंथम सॉन्ग. कोणाची लागणार, कोणाची वाचणार हे तुमच्या हातात आहे. कारण यावेळी जनता खारी बॉस आहे. @raftaarmusic हे गाणं लिहिण्यात आलं असून कंपोज करण्यात आले आहे. जिओ सिनेमावर 17 जून पासून मोफत पाहता येणार आहे.

Vitthal Maza Sobati: भक्तिरसात तल्लीन करणारा ‘विठ्ठल माझा सोबती’ 

सलमान खानने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता पाहायाला मिळत आहे. तर एका चाहत्याने लिहिले की, वाह सलमान भाई, आम्ही वाट नाही पाहू शकतं. एकाने लिहील आहे की, लव यू सलमान खान. कीप शाइनिंग. त्यामुळे आता या सीझनमध्ये कोण-कोण असणारं आहे. याची उत्सुकता मात्र कायम आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube