अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या आई हेमवंती देवी यांचं 89 व्या वर्षी निधन झालं आहे. (Film) पंकज त्रिपाठी यांच्या कडून जारी केलेल्या निवेदनाद्वारे ही दु:खद बातमी समोर आली आहे. आम्हाला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की पंकज त्रिपाठी यांच्या प्रिय माता श्रीमती हेमवंती देवी यांचं बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील बेलसंड येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या काही काळापासून आजारी होत्.
Pankaj Tripathi: मिर्ज़ापुर फेम अभिनेता पंकज त्रिपाठींने कामातून घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर
पंकज त्रिपाठींचं आपल्या आईशी अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं. त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्यांच्या आयुष्यातील संस्कार, संयम आणि साधेपणा आईकडूनच मिळाला. त्यामुळे त्यांच्या निधनानं संपूर्ण चाहतावर्ग आणि चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वडील पंडित बनारस त्रिपाठी यांचंही निधन झालं आहे.पंकज त्रिपाठी यांनी आपल्या वडिलांकडूनच साधेपणा आणि कष्टाची शिस्त शिकली होती. त्यांचे वडील एक पुजारी आणि शेतकरी होते, आणि पंकजही लहानपणी शेतीकामात वडिलांना हातभार लावत असत.
पुढे पटना येथील नाट्यमहाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मधून पदवी घेतली आणि अभिनयाच्या आवडीला करिअरमध्ये रूपांतरित करण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत सुरुवातीला संघर्षाचा काळ होता, पण अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून त्यांना मोठी झेप मिळाली. या चित्रपटानंतर त्यांच्या अभिनयाला नवी ओळख मिळाली.
