दु:खद बातमी! भारताचे माजी क्रिकेटपटू राजेश बानिक यांचं रस्ते अपघातात निधन
राजेश बानिक हा इरफान पठाण आणि अंबाती रायुडू यांच्यासोबतही खेळला होता. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
भारतीय क्रिकेटविश्वातून एक दुख:त बातमी समोर आली आहे. (MOA) माजी क्रिकेटपटू राजेश बानिक यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. राजेश बानिक हा भारतीय अंडर-19 संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू होता. त्याचं आता 40 वर्षे होतं. बानिक याचा मृत्यू पश्चिम त्रिपुरातील आनंदनगर येथे झाल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
राजेश बानिक हा इरफान पठाण आणि अंबाती रायुडू यांच्यासोबतही खेळला होता.दरम्यान, त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे सचिव सुब्रता डे यांनी त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं की, आम्ही एक प्रतिभावान क्रिकेटपटू आणि अंडर-16 संघाचा निवडकर्ता गमावला आहेत. हे अत्यंत दु:खद आहे. भगवान त्याच्या आत्म्यास शांती देवो.
भारताचा दक्षिण अफ्रिकेवर तीन गडी राखून दणदणीत विजय, मालिकेत घेतली 1-0 ने आघाडी
राजेश बानिक याचा भीषण रोड अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अगरतला येथील जीबीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केलं. राजेश बानिक याने त्रिपुरासाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना उत्तम कामगिरी केली होती. त्याने 42 प्रथम श्रेणी सामने खेळत 1469 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर याशिवाय, 24 लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याने 378 धावा आणि 8 विकेट्स, तर 18 टी-20 सामन्यांत 203 धावा केल्या. त्याचा शेवटचा रणजी सामना 2018 मध्ये ओडिशाविरुद्ध झाला होता. त्रिपुरातील क्रिकेट विश्वात बानिक हा फक्त उत्कृष्ट ऑलराउंडर नव्हता, तर तरुण प्रतिभांचा शोध घेण्यातही निपुण होता. म्हणूनच त्याला राज्याच्या अंडर-16 संघाचे निवडकर्ता बनवण्यात आलं होतं. त्याच्या अचानक जाण्याने त्रिपुरा क्रिकेटला मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
