Pankaj Tripathi: ‘मिर्ज़ापुर’ फेम अभिनेता पंकज त्रिपाठींने कामातून घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

Pankaj Tripathi: ‘मिर्ज़ापुर’ फेम अभिनेता पंकज त्रिपाठींने कामातून घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

Pankaj Tripathi Take A Break from Work: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठीच्या (Pankaj Tripathi ) घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मेहुण्याचं मृत्यू झाला आणि त्याची बहीण रस्ता अपघातात गंभीर जखमी झाली. (Pankaj Tripathi ) या घटनेनंतर अभिनेता हादरला असून त्याने काही दिवस कामातून ब्रेक घेतला आहे. सध्या अभिनेता आपल्या कुटुंबाला वेळ देत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by UPI Chalega (@upichalega)


पंकज त्रिपाठी यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला

जेव्हा हा अपघात झाला तेव्हा अशी बातमी आली होती की त्याची बहीण आणि भावजय पंकज त्रिपाठीचे शूटिंग पाहण्यासाठी गेले होते. या विषयीची माहिती खंडन करताना सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, घटनेच्या वेळी पंकज त्रिपाठी त्यांच्या गावात होते. या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी तो प्रयत्नशील असला तरी त्याला कुटूंबाला वेळ द्यावा लागणार आहे.

पंकज त्रिपाठी त्यांच्या कुटुंबासोबत आहेत

सूत्राने पुढे सांगितले की, घटनेच्या वेळी पंकज त्रिपाठी हे कामावरून सुटीवर गावी होते. ते कोणतेही शूटिंग करत नव्हते. आता तो या घटनेतून सावरण्यासाठी वेळेचा वापर करत आहे आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.

पंकज त्रिपाठी लवकरच मुंबईत परतणार

यावेळी असेही सांगण्यात आले की, पंकज त्रिपाठी लवकरच मुंबईत परतणार असून त्यांच्या पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तो पुढे अनुराग बसूच्या प्रोजेक्टवर आणि क्रिमिनलच्या पुढच्या वेब शोमध्ये काम करणार आहे.

अजय देवगणच्या ‘मैदान’चा मोठा फटका’, ‘BMCM’ सिनेमाला, 21व्या दिवशी किती झाली कमाई?

झारखंडमध्ये हा अपघात झाला

20 एप्रिल रोजी झारखंडमध्ये एका रस्ते अपघातात पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा मृत्यू झाला होता. धनबादच्या सिरसा येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात बहीण आणि तिची दोन मुलेही जखमी झाली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज