‘बलोच’मध्ये दिसणार मराठ्यांची शौर्यगाथा, प्रवीण तरडेंच्या मोशन पोस्टरने वेधले लक्ष

Pravin Tarde Marathi Movie Baloch : पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची असीम शौर्यगाथेचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये अभिनेते प्रवीण तरडे यांचा अंगावर काटा आणणारा लूक बघायला मिळत आहे.   View this post on Instagram   A post shared by @prakashjpawar […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T134832.593

Marathi Movie

Pravin Tarde Marathi Movie Baloch : पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची असीम शौर्यगाथेचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये अभिनेते प्रवीण तरडे यांचा अंगावर काटा आणणारा लूक बघायला मिळत आहे.


आजवर देशासाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई रुपेरी पडद्यावर आपल्याला दाखवण्यात आली. परंतु अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची. पानिपतच्या पराभवावर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा ‘प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये बघायला मिळणार आहे.

पानिपतचा पराभव मराठ्यांसाठी महाप्रलयच ठरला होता. या पराभवानंतर बलुचिस्तानात मराठेशाहीला गुलामगिरी पत्करावी लागली होती. पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीचा काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा राहिली आहे. ‘बलोच’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही विजयगाथा आता पडद्यावर बघायला मिळणार आहे.

‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट आणखी…” नागराज मंजुळेंनी केला मोठा खुलासा

‘बलोच’ या सिनेमात प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि अशोक समर्थ (Ashok Samarth) मुख्य भूमिकेमध्ये आहे. नुकतचं या सिनेमाचं मोशन पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. मोशन पोस्टरमध्ये प्रवीण तरडे यांच्या नजरेमध्येच मराठ्यांना मिळणाऱ्या वागणुकीविरोधात धगधगणारी आग असल्याचे दिसून येत आहे. तर मराठ्यांवर अत्याचार करणारा अफगाणी आहे.

पानिपतची लढाई आणि पराभव ही मराठेशाहीकरिता जरी काळा दिवस असला तरी मराठी ही मराठ्यांच्या असीम शौर्याची गाथा आहे, जी ‘बलोच’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘बलोच’ या सिनेमाची कथा, पटकथा प्रकाश पवार यांची आहे. हा सिनेमा 2023 मध्ये दसऱ्याच्या शुभमुर्हूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘बलोच’च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे.

Exit mobile version