Download App

अरे बापरे! 72 कोटींची संपत्ती केली थेट संजय दत्तच्या नावावर, कट्टर चाहत्याची नेमकी कहाणी काय?

  • Written By: Last Updated:

Sanjay Dutt Fan Nisha Patil Left 72 Crore Propery For Him : बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता संजय दत्तचे चाहते खूप आहेत. त्याच्या एका कट्टर चाहत्याने सिद्ध केलंय की, एखाद्या अभिनेत्याबद्दल किती खोलवर वेड असू शकते. अलीकडेच, संजय दत्तच्या (Sanjay Dutt) एका चाहत्याने त्याची संपूर्ण मालमत्ता, जी सुमारे ७२ कोटी रुपये किमतीची असल्याचं सांगितलं जातंय. ती संजय दत्तला हस्तांतरित केलीये. आता हे वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसलेला असेल. परंतु संजय दत्तने ही मालमत्ता घेण्यास नका 7र दिला. मरणापूर्वी हे पाऊल उचलणारा हा चाहता नेमका कोण आहे? हे सविस्तर जाणून घेऊ या.

ही निशा पाटील नावाच्या महिलेची ही मनोरंजक आणि आश्चर्यकारक कहाणी आहे. तिने तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात तिची संपूर्ण मालमत्ता संजय दत्तला हस्तांतरित केली. 2018 मध्ये निशा पाटील यांनी मृत्यूपूर्वी हे पाऊल (Entertainment News) उचललं. पोलिसांनी संजय दत्तला सांगितलं की, निशाने तिची 72 कोटी रुपयांची मालमत्ता त्याच्या नावावर हस्तांतरित केलीय. तेव्हा हा प्रकार समोर आलाय. निशाने या निर्णयाबाबत बँकांना देखील पत्र पाठवले होतं. जेणेकरून मालमत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.

संजयने निशाची मालमत्ता का नाकारली?
संजय दत्तसाठी ही घटना खूपच धक्कादायक होती. कारण, तो कधीही निशाला वैयक्तिकरित्या भेटला नव्हता. त्याचे तिच्याशी कोणतेही विशेष नाते नव्हते. जेव्हा संजय दत्तला हे कळले तेव्हा त्याला धक्काच बसला. संजय दत्तने ही मालमत्ता स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्याच्या वकिलांनी असेही स्पष्ट केलंय की, अभिनेत्याचे निशा पाटीलशी कोणतेही वैयक्तिक संबंध नव्हते. त्यामुळे संजय दत्तने ती प्रॉपर्टी स्वीकारणे योग्य मानलं नाही, अशी माहिती फायनान्शिअल एक्सप्रेसच्या हवाल्याने मिळतेय.

निशा पाटील ही मुंबईतील एक 62 वर्षीय गृहिणी होती. संजय दत्तची कट्टर चाहती होती. तिला एका गंभीर आजाराने ग्रासलं होतं. त्यामुळे तिने तिची संपत्ती मृत्यूपत्राद्वारे संजय दत्तच्या नावे केली होती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिने कधीही संजय दत्तला प्रत्यक्षात पाहिलेलं नव्हतं. ही बातमी ऐकून संजय दत्त स्तब्ध झाला. त्याने एक रुपयाही स्वीकारण्यास नकार देऊन सर्वांना धक्का दिलाय. मी काहीही दावा करणार नाही. मी निशाला ओळखत नव्हतो. या संपूर्ण घटनेने मी भारावून गेलो आहे, असं संजय दत्त म्हणालाय.

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आमचा संशय सुरेश धसांवर, कॉल डिटेल तपासा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

निशा पाटीलच्या शेवटच्या इच्छेने सिद्ध केलंय की, सेलिब्रिटी सामान्य लोकांच्या जीवनाला किती खोलवर स्पर्श करू शकतात. सोबतच संजय दत्तच्या सन्माननीय नकाराने दाखवून दिलंय की कधीकधी, वास्तविक जीवनातील नायक रुपेरी पडद्याच्या पलीकडेही अस्तित्वात असतात.

संजय दत्तने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथ इंडस्ट्रीतही आपली ओळख निर्माण केली आहे. त्याने यशसोबत ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये काम केलंय. थलापती विजयसोबत ‘लिओ’ मध्ये दिसला. याशिवाय संजय दत्त लवकरच ‘वेलकम 3’ आणि ‘रौर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, संजय दत्त त्याच्या विविध व्यवसायांमधूनही पैसे कमवतो. तो अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतो आणि त्याची एकूण संपत्ती सुमारे 295 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

पालकमंत्रिपदाचा वाद कधी मिटणार? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, अजितदादांसोबत बैठक…

संजय दत्तची संपत्ती केवळ चित्रपट उद्योगापुरती मर्यादित नाही, तर त्याच्याकडे दुबई आणि मुंबईमध्ये मालमत्ता, आलिशान कार आणि व्हिस्की ब्रँड देखील आहे. एवढेच नाही तर तो क्रिकेट संघांचा सह-मालक देखील आहे. चित्रपट उद्योगाव्यतिरिक्त त्याच्या व्यवसायातूनही तो भरपूर कमाई करतो. संजय दत्तची कमाई आणि त्याच्या विविध मालमत्ता त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि क्षमतेचे प्रतीक आहेत.

 

follow us