Sanjay Dutt च्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राइज; ‘केडी द डेविल’ मधील फर्स्ट लुक समोर

Sanjay Dutt च्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राइज; ‘केडी द डेविल’ मधील फर्स्ट लुक समोर

Sanjay Dutt first look from KD The Devil on Birthday : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने आतापर्यंत अनेक भूमिका गाजवल्या आहेत. त्यातच आता त्याच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांकडून त्याच्या आगामी चित्रपट ‘केडी द डेविल’ (KD The Devil) मधील त्याचा फर्स्ट लूक रिलीज (first look) करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो खलनायकाची भूमिका साकारत असून अत्यंत भयावह अवतारात दिसत आहे.

Maharashtra: चार वर्षात 12 हजार उद्योगांची वाताहात; पाच लाख कामगारांनी गमावले हातचे काम

संजय दत्तच्या या भूमिकेबद्दल सांगताना दिग्दर्शक प्रेम यांनी म्हटलं की, संजय दत्तच्या अभिनयाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी अनेक प्रभावशाली भूमिका निभावल्या आहेत. त्यांच्या मुन्नाभाई या भूमिकेचं आजही तेवढेच कौतुक होतं. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम करण्यासाठी होकार दिला आणि आता मी त्यांच्यासोबत काम करत आहे. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

Sai Tamhankar चा फ्लोरल ब्युटी अंदाज; खास फोटोंनी वेधले लक्ष

तर स्वतः संजय दत्तने आपल्या भूमिकेबद्दल सांगताना म्हटलं की, केडी द डेव्हिल या चित्रपटाचा भाग होणं माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. प्रेम यांनी ज्याप्रमाणे या चित्रपटाची कल्पना केली आहे. ती अत्यंत खास आहे. हा एक ऐतिहासिक ॲक्शन आणि पॅन इंडिया चित्रपट आहे.

दरम्यान संजय दत्तसह या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, नोरा फतेही, रमेश अरविंद, वी रविचंद्रन आणि ध्रुव सरजा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. हा चित्रपट 1970 च्या दशकातील बेंगळुरू येथील एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती केवीयन प्रोडक्शन्स यांच्याकडून करण्यात आली असून हा चित्रपट तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम यासह हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube