Sanjay Dutt Accident: संजय दत्तचा शूटिंगदरम्यान अपघात; डोक्याला पडले टाके

Sanjay Dutt Accident: संजय दत्तचा शूटिंगदरम्यान अपघात; डोक्याला पडले टाके

Sanjay Dutt: सध्या संजय दत्त त्याचा आगामी सिनेमा ‘डबल आईस्मार्ट’च्या (Double iSmart) शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. (Sanjay Dutt Accident) दरम्यान त्याचा अपघात झाला आहे.’ए मामू’ हा डायलॉग म्हणत चाहत्यांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारा अभिनेता संजय दत्त सध्या दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीमध्ये (Entertainment) एन्ट्री केल्याचे बघायला मिळत आहे.

लवकरच त्याचा ‘डबल इस्मार्ट’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान संजय दत्तचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला टाके पडल्याचे सांगितले जात आहे.’डबल इस्मार्ट’ या सिनेमाचे बँकॉकमध्ये शूटिंग सुरु आहे. तलवारबाजीचा सीन शूट करत असताना संजय दत्तचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत.

त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु संजय दत्तने उपचार घेतल्यावर शुटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती आणि आता संजय दत्त पूर्णपणे बरा असल्याचे सांगितले जात आहे. ‘डबल इस्मार्ट’ हा संजय दत्तचा पहिला तेलुगू सिनेमा आहे.

Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! सैफ अली खानच्या ‘Devara’चा फर्स्ट लूक आऊट

या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा पुरी जगन्नाध यांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा या अगोदरचा ‘लायगर’ हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरल्याचे बघायला मिळाले होते. संजय दत्तने ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमाच्या माध्यमातून कन्नड मनोरंजन सृष्टीमध्ये एन्ट्री केली होती. यानंतर त्याचा ‘लियो’ हा सिनेमा तामिळ भाषेत आहे. या सिनेमातून तो तामिळ मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube