देवाचं स्वतःहून बोलावणं येतं; अभिनेता स्वप्नील जोशी पोहचला बद्री केदारनाथच्या दर्शनाला!

Swapnil Joshi reached At Badrinath Kedarnath : अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) बद्री केदारनाथच्या (Kedarnath) दर्शनाला पोहचला आहे. स्वप्नील जोशीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या ट्रिपचा खास व्हिडिओ देखील शेअर केलाय. अभिनेता स्वप्नील जोशी 2024 हे वर्ष गाजवत आहे. नुकताच स्वप्नील जोशीने वाढदिवस देखील साजरा केलाय. परंतु स्वप्नीलने त्याचा वाढदिवस वर्किंग बर्थडे म्हणून साजरा […]

Swapnil Joshi

Swapnil Joshi

Swapnil Joshi reached At Badrinath Kedarnath : अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) बद्री केदारनाथच्या (Kedarnath) दर्शनाला पोहचला आहे. स्वप्नील जोशीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या ट्रिपचा खास व्हिडिओ देखील शेअर केलाय. अभिनेता स्वप्नील जोशी 2024 हे वर्ष गाजवत आहे. नुकताच स्वप्नील जोशीने वाढदिवस देखील साजरा केलाय. परंतु स्वप्नीलने त्याचा वाढदिवस वर्किंग बर्थडे म्हणून साजरा केला होता.

आज स्वप्नील जोशीने शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. स्वप्नील नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक आयुष्यातील छोटे, छोटे अपडेट्स चाहत्यांना देत असतो. 2024 हे वर्ष स्वप्नील जोशीसाठी जितकं बिझी आहे, तितकंच ते खास देखील आहे. कामाच्या व्यापामधून स्वप्नील जोशी प्रवास करताना देखील दिसतोय. नुकताच स्वप्निलने त्याच्या बद्री केदारनाथ ट्रिपचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
Swapnail Joshi चा नाच गं घुमा उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला; उत्सुकता शिगेला

स्वप्नील जोशी म्हणतोय की, कलाकार म्हणून कामाच्या निमित्ताने असो किंवा अनेक कारणाने आपण प्रवास करत असतो. बऱ्याचदा हा प्रवास आपसूक पने घडून येतो ! असाच बद्री केदारनाथचा हा प्रवास. कधी कधी देवाचं स्वतःहून बोलावणं येतं आणि यातून एक वेगळीच ऊर्जा मिळते मी या सगळ्यासाठी खूप कृतज्ञ आहे. या वर्षाची सुरुवात स्वप्नीलने अभिनेता नाही तर निर्मिती विश्वात पदार्पण करून नाच गं घुमा सुपरहिट केला ! नंतर बाई गं आणि आताचा नवरा माझा नवसाचा 2 हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले आणि त्यांनी तुफान कमाई देखील केलीय.

Swapnil Joshi: … आणि म्हणून मी प्रत्येक प्रमोशनसाठी जातोय, अभिनेत्याने व्यक्त केला आनंद
येणाऱ्या काळात स्वप्नील अनेक वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट तर करणार आहे. पण तो अजून एका खास चित्रपटाची निर्मिती देखील करणार आहे.स्वप्नील आगामी जिलबी, सुशीला- सुजीत आणि अनेक प्रोजेक्ट्सचा भाग होणार असल्याचं कळतंय ! स्वप्नीलची केदारनाथची वारी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली असल्याचं दिसतंय. मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉयच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Exit mobile version