Actress Akshaya Naik : अभिनेत्री अक्षया नाईक नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला !

Actress Akshaya Naik : नेटफ्लिक्सवरून 2025 मध्ये बॉलिवूड आणि ओटीटी पदार्पण केलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. अभिनयाने बॉलिवुड प्रेक्षकांना

Actress Akshaya Naik

Actress Akshaya Naik

Actress Akshaya Naik : नेटफ्लिक्सवरून 2025 मध्ये बॉलिवूड आणि ओटीटी पदार्पण केलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. अभिनयाने बॉलिवुड प्रेक्षकांना मोहित करणारी अभिनेत्री आता पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. “संतांची बोली, विठ्ठ्लाची गोडी” या किर्तन विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची धुरा अक्षया सांभाळताना दिसणार आहे.

स्टार प्रवाह वर हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला असून लवकरच स्टार प्रवाह पिक्चर वर तसंच कलर्स मराठीवर याच टेलिकास्ट होणार असून प्रेक्षकांची लाडकी सुंदरा पुन्हा एकदा मन जिंकणार यात शंका नाही. या कार्यक्रमाबद्दल बोलताना अभिनेत्री अक्षया नाईक सांगते “संतांची वाणी, कीर्तन, अभंग या सगळ्यांशी गेल्या 2-2.5 वर्षात संबंध कसा आणि कधी वाढला कळलंच नाही. या ना त्या कारणाने मी विठ्ठलाच्या जवळ गेले. 2024 मध्ये “वारसा कीर्तनाचा” या कार्यक्रमाचं निवेदन करायला मिळालं तेव्हा नव्याने विठ्ठलाशी जोडले गेले आणि तेव्हापासून त्याने माझी साथ सोडली नाहीये.

माझा सर्वात आवडता band सुद्धा “अभंग Repost” आहे. कीर्तन कला ही महाराष्ट्राला लाभलेली देणगी आहे, आणि ती लोकांपर्यंत माझ्या कलेतून पोहचवता येत आहे या पेक्षा जास्ती आनंद नाही.

सावध राहा, पुढील 48 तास पुणे, अहिल्यानगरसह ‘या’ 13 जिल्ह्यांत थंडीची लाट; अलर्ट जारी

“संतांची बोली, विठ्ठलाची गोडीच्या” 30 एपिसोडचे सूत्रसंचालनाच्या लिंक शूट आम्ही एका दिवसात केलं आणि म्हणून अश्या शूट ची गंमत ही काही वेगळीच होती” येणाऱ्या काळात देखील सगळ्यांची लाडकी सुंदरा लवकरच नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्सचा भाग होताना दिसणार असल्याचं कळतंय.

Exit mobile version