IPS अधिकाऱ्याच्या कारला अभिनेत्रीची जाणूनबुजून टक्कर? गुन्हा दाखल झाल्यानंतरचं ट्विट चर्चेत

Dimple Hayati: प्रसिद्ध टॉलिवूडची अभिनेत्री डिंपल हयाती (Dimple Hayati) आणि तिच्या मित्रावरून ज्युबिली हिल पोलिसांनी (Jubilee Hills Police) गुन्हा दाखल केला आहे. अपार्टमेंटजवळील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या (IPS officers) कारचे नुकसान केल्याचा आरोप तिच्यावर आणि तिच्या मित्रावर आहे. डिंपलने तिच्या अपार्टमेंटमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारला आपल्या कारने जोरादार धडक दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. Misuse […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 23T150450.405

Dimple Hayati

Dimple Hayati: प्रसिद्ध टॉलिवूडची अभिनेत्री डिंपल हयाती (Dimple Hayati) आणि तिच्या मित्रावरून ज्युबिली हिल पोलिसांनी (Jubilee Hills Police) गुन्हा दाखल केला आहे. अपार्टमेंटजवळील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या (IPS officers) कारचे नुकसान केल्याचा आरोप तिच्यावर आणि तिच्या मित्रावर आहे. डिंपलने तिच्या अपार्टमेंटमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कारला आपल्या कारने जोरादार धडक दिल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यामुळे कारचं मोठं नुकसान झालं आहे. डिंपल आणि आयपीएल अधिकारी एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. अधिकाऱ्याच्या ड्राइव्हरने पोलिसांत डिंपल आणि तिच्या मित्राविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 14 मे दिवशी डिंपल आणि तिच्या मित्राने जाणूनबुजून IPS अधिकाऱ्याच्या कारला टक्कर मारली, असं ड्रायव्हरने त्याच्या तक्रारीमध्ये सांगितले आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी डिंपल आणि तिच्या मित्राविरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी तिला आणि तिच्या मित्राला पोलीस ठाण्यात बोलावले आणि सीआरपीसीच्या 41ए कलमाअंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेनंतर आता डिंपलने ट्विट करत तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत सांगितले आहे की, ‘ताकदीचा वापर करून चुका लपवल्या जाऊ शकत नाही.’ यासोबतच तिने ‘सत्यमेव जयते’ हा हॅशटॅग आणि हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

डिंपलने तिच्या या ट्विटमधून संबंधित आयपीएस अधिकाऱ्याला टोमणा मारल्याचे सांगितले जात आहे. डिंपलने आजवर काही तेलुगू आणि तमिळ सिनेमामध्ये काम केले आहे. डिंपलचे वडील तमिळ भाषिक आहेत तर आई तेलुगू भाषिक आहे. आंध्रप्रदेशमधील विजयवाडा याठिकाणी तिचा जन्म झाला आहे. ती हैदराबादमध्ये लहानाची मोठी झाली आहे.

2017 मध्ये ‘गल्फ’ या तेलुगू सिनेमातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यावेळेस ती 19 वर्षांची होती. यानंतर तिने ‘युरेका’, ‘देवी 2’ यांसारख्या सिनेमामधून भूमिका साकारले आहेत. ‘गड्डलकोंडा गणेश’ या सिनेमातील ‘जरा जरा’ या आयटम साँगमध्येही ती चांगलेच झळकली होती.

Exit mobile version