…म्हणून या भूमिकेला होकार दिला – अगं अगं अहो आई वेब सिरीजबद्दल अभिनेत्री हृता काय म्हणाली?

Aga Aai Aho Aai मध्ये मी श्रेयाची भूमिका साकारतेय. रेणुका ताई माझ्या आईच्या भूमिकेत आहेत, तर निर्मिती ताई माझ्या सासूची भूमिका साकारत आहेत.

Aga Aai Aho Aai

Aga Aai Aho Aai

Actress Hruta Durgule said about web series ‘Aga Aga Aho Aai’ Why she agreed to this role : “अगं अगं अहो आई “मध्ये मी श्रेयाची भूमिका साकारतेय. रेणुका ताई माझ्या आईच्या भूमिकेत आहेत, तर निर्मिती ताई माझ्या सासूची भूमिका साकारत आहेत. त्यामुळे खरं सांगायचं तर या मालिकेला नाही म्हणण्याचं काहीच कारण नव्हतं. ही सहा भागांची मालिका नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या आयुष्यातील पहिल्या वर्षाभोवती फिरते. त्या काळात घडणारे अनेक महत्त्वाचे प्रसंग प्रत्येकालाच कुठे ना कुठे रिलेट होतील. कल्याणी पंडित यांनी ते अतिशय सुंदर लिहिलं आहे आणि वरुण नार्वेकर यांनी ते तितक्याच वास्तववादी पद्धतीने पडद्यावर आणलं आहे.

मोठी बातमी! परिक्षा सुधारणा विधेयक संसदेत मंजूर; पेपरफुटीविरोधात कडक कायद्याची तरतूद

या मालिकेचा लुक, फील आणि एकूणच टोन खूप नैसर्गिक आहे. नव्या घरात जाण्याची धाकधूक, नव्या नात्यांशी जुळवून घेणं आणि दोन्ही बाजूंनी होणारे प्रयत्न हे सगळंच खूप खरं आणि जवळचं वाटतं. त्यामुळे श्रेयाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे.”लग्नानंतर तुझी व्यक्तिरेखा पुण्याहून कोल्हापूरला येते. आजच्या तरुण मुलींना तिचा हा प्रवास किती
जवळचा वाटेल असं वाटतं?

रंगभूमीवर रंगणार ‘मुक्काम पोस्ट पंढरपूर’चा भावस्पर्शी प्रवास! विठ्ठलभक्ती, श्रद्धा आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणार!

मला असं वाटतं की आम्ही या मालिकेतून कोणालाही काही शिकवण्याचा किंवा उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला नाही. ही मुख्यतः श्रेया, तिची आई आणि तिची सासू यांच्या नात्यांची गोष्ट आहे. ज्या पद्धतीने त्यांचा प्रवास उलगडत जातो, तो खूप प्रामाणिक आणि रिलेटेबल आहे. त्यामुळे यातून काही शिकण्यापेक्षा प्रेक्षकांनी त्यांचा हा प्रवास अनुभवावा आणि एन्जॉय करावा, एवढंच मला वाटतं. व्यक्तिरेखेचं तिच्या सासूबरोबर एक खास नातं आहे. सासू-सुनेच्या नात्याबद्दलचे ठरलेले समज आणि साचेबद्ध प्रतिमा यापलीकडे जाणं किती महत्त्वाचं आहे, असं तुला वाटतं?

गृहमंत्र्यांच्या आदेशाने विद्यार्थ्यांवर गोळीबार; लोकसभेत राहुल गांधींच्या गंभीर आरोप, भाजपकडून जोरदार आक्षेप, कामकाज तहकूब

मला वाटतं सासू-सुनेच्या नात्याबद्दल अनेक ठरलेले समज आहेत, पण प्रत्येक नातं सारखंच असतं असं नाही. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. आज अनेक घरांमध्ये सून ही कुटुंबाचा समान सदस्य म्हणून स्वीकारली जाते. तिच्या विचारांना, मतांना आणि व्यक्तिमत्त्वाला तितकाच आदर दिला जातो. मला वाटतं ही समानता आणि परस्परांचा आदर प्रत्येकाच्या वैयक्तिक विकासासाठीही खूप महत्त्वाचा आहे”

 

Exit mobile version