सरकारी शाळा बंद करण्याऐवजी अधिक सक्षम करण्याची गरज; आमदार सत्यजीत तांबेंची भूमिका

MLA Satyajit Tambe यांनी सरकारी शाळा बंद करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.

Satyajit Tambe On Lok Sabha Election  : लोकसभा रणांगण! महायुती की आघाडी? सत्यजित तांबेच्या मनात काय?   

Need to empower government schools instead of closing them down Role of MLA Satyajit Tambe : देशभरात गेल्या पाच वर्षांत 17 हजारांहून अधिक सरकारी शाळा बंद झाल्याची बाब गंभीर असून, महाराष्ट्रातील 1,068 सरकारी शाळांचाही त्यामध्ये समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारी शाळा बंद करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.

एकतर माफी मागा, नाहीतर पुरावे द्या; राहुल गांधींच्या वक्तव्यावरून किरेन रिजिजूंचा कडक इशारा

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार तांबे म्हणाले की, सरकारी शाळा बंद करणे हा उपाय होऊ शकत नाही. त्याऐवजी शाळांचा दर्जा कसा उंचावता येईल, विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल आणि पालकांचा विश्वास पुन्हा सरकारी शिक्षण व्यवस्थेवर कसा निर्माण होईल, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

‘चिल्ड्रेन ऑफ ब्लड अँड बोन’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; टोमी अदेयेमींची गाजलेल्या कादंबरीला मोठ्या पडद्यावर

सरकारी शाळा टिकल्या तरच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल. त्यामुळे शाळा बंद करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे. “शाळा बंद होऊ नयेत… शाळा मजबूत व्हायला हव्यात,” असे आवाहन त्यांनी केले.

follow us