Actress Manisha Koirala : वयाच्या 54 व्या वर्षी देखील अभिनेत्री मनिषा कोईराला एकटीच आयुष्य जगते. (Actress) बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केलं. पण अभिनेत्रीचे आजोबा आणि वडील राजकारणास सक्रिय होते. पैसा, प्रसिद्धी सर्वकाही असताना आज वयाच्या 54 व्या वर्षी एकटीच आयुष्य का जगत आहे
मनिषा हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली आहे. फिल्मफेअरपासून अनेक पुरस्कार अभिनेत्रीने स्वतःच्या नावावर केले आहेत. मनिषा कोईराला हिच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, प्रकाश कोईराला नेपाळ येथील प्रसिद्ध नेते होते. अभिनेत्रीचे आजोबा बिश्वेशवर प्रसाद नेपाळचे माजी पंतप्रधान होते. सांगायचं झालं तर, मनिषाने तिच्या अफेअरबद्दल देखील सर्वकाही सांगितलं. अनेक प्रसिद्ध आणि श्रीमंत सेलिब्रिटींना अभिनेत्रीने डेट केलं आहे.
किंग सिनेमाच्या शुटिंगदरम्यान शाहरूख खान जखमी; उपचारांसाठी अमेरिकेला रवाना
मनिषा कोईराला हिने बॉयफ्रेंड्सच्या यादीमध्ये अभिनेते नाना पाटेकर आणि विवेक मुशरान यांची देखील नावे होती. नाना पाटेकर यांच्यासोबत मनिषा हिच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. दोघांमध्ये तब्बल 20 वर्षांचा फरक होता. नाना पाटेकर याचं लग्न झालेलं असताना त्यांनी मनीषाला डेट केलं. असं म्हणतात की एकदा मनीषाने नाना यांनी अभिनेत्री आयेशा हिच्यासोबत रंगेहाथ पकडलं. त्यानंतर नाना पाटेकर आणि मनिषा कधीच एकमेकांसोबत दिसले नाहीत.
11 जणांसोबत प्रेमसंबंध ठेवल्यानंतर अभिनेत्रीने नेपाळी उद्योजक सम्राट दहल याच्यासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘लग्नानंतर माझा नवराच माझा सर्वात मोठी शत्रू झाला. मी घाईत निर्णय घेतला. लग्न मलाच करायचं होतं. पण नंतर मला कळलं माझा जन्म यासाठी झालेला नाही. चूक फक्त माझी होती. असं देखील अभिनेत्री म्हणाली होती. आता मनिषा बॉलिवूडमध्या पूर्वी प्रमाणे सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.