पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अली कोण होती? जिचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळला

पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अली कोण होती? जिचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळला

Humaira Asghar Ali : पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अलीचा (Humaira Asghar Ali) निधन झाला आहे. तिच्या कराचीतील फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडीला आहे. कराची पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार अभिनेत्री हुमैरा असगर अली तिच्या मृत्यूच्या तीन आठवड्यांनंतर कराचीतील (Karachi) डिफेन्स एरियामधील तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

कोण होती हुमैरा असगर अली?

30 वर्षीय अभिनेत्री हुमैरा असगर अली एक लोकप्रिय अभिनेत्री (Pakistani Actress Humaira Asghar Ali) आणि मॉडेल होती. माहितीनुसार, हुमैराने पाकिस्तानी शो ‘तमाशा घर’ आणि पाकिस्तानी चित्रपट ‘जलिबी’ मध्ये काम केलं आहे. कमी वयात तिने पाकिस्तानी चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पाकिस्तानी मीडियानुसार, गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री हुमैरा तिच्या कराचीतील फ्लॅटमध्ये एकटी राहत होती.

काही दिवसांपासून तिच्या शेजाऱ्यांनी हुमैराच्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत होती. यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच पोलीस अभिनेत्रीच्या घरी आले. पोलिसांनी दार ठोटावले मात्र त्यांना काही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला.

विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा, ‘या’ दिवशी मिळणार पगार, मंत्री गिरिष महाजनांची मोठी घोषणा

तेव्हा पोलिसांना हुमैरा जमिनीवर मृत्यावस्थेत दिसली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत पुढील तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हुमैराचा मृत्यू नैसर्गिक आहे. पोलिसांनी सध्या तिचा मृत्यदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या