अरेच्चा.. भूकंपात मिळाली नामी संधी, कराचीत जेल तोडून 200 कैदी पळाले; कुख्यात अतिरेकीही पसार

अरेच्चा.. भूकंपात मिळाली नामी संधी, कराचीत जेल तोडून 200 कैदी पळाले; कुख्यात अतिरेकीही पसार

Pakistan News : पाकिस्तानच्या कराची शहरातून एक (Pakistan News) चमत्कारिक बातमी समोर आली आहे. कराचीत सोमवारी (Karachi Jail) एक भूकंप झाला. या भुकंपात काय नुकसान झालं याची माहिती अजून समोर आलेली नाही मात्र या भूकंपाने तुरुंगातील कैद्यांना पळून जाण्याची संधी मात्र दिली. भुकंपामुळे कराचीतील मलीर जेलमध्ये एकच धावपळ उडाली. याच दरम्यान जेलमधील तब्बल 200 कैदी जेल तोडून पळून गेले.

जेल तोडून पळून जाताना अनेक जण जखमीही झाले. एका कैद्याचा मृत्यू झाला. येथे गोळीबारही झाला. यात तुरुंगाचे गार्ड जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कराचीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पळून गेलेल्या कैद्यांना शोधण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्च ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 78 कैद्यांना पकडण्यात आले आहे. भूकंप झाला त्यावेळी सुरक्षिततेचा उपाय म्हणून कैद्यांना कोठडीतून बाहेर आणले होते. यामुळे 700 ते 1000 कैदी मुख्य प्रवेशद्वाराजळ जमा झाले होते. याच दरम्यान काही कैद्यांनी अचानक सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यांच्याकडील हत्यारे हिसकावून घेण्यात आले. यामुळे एकच धावपळ उडाली काय होतंय हे कळण्याच्या आतच 216 कैदी फरार झाले.

India-Pakistan War : पाकिस्तानला पुन्हा संधी नाहीच! युद्धविरामानंतर माजी लष्करप्रमुख व्यथित…

रिपोर्टनुसार भूकंपाच्या धक्क्यांनंतर सर्व बराकी उघडल्या गेल्या. त्यामुळे येथे अफरातफरीची परिस्थिती निर्माण झाली. याच वेळी कैद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडील बंदुका हिसकावून घेत गोळीबार केला. जबरदस्तीने गेट खोलले आणि पळून गेले. सिंध प्रांताचे गृहमंत्री जिया उल हसन लांजर यांनी कैदी जेल तोडून गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. सोशल मीडियावरही या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत कैदी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

या घटनेनंतर कराची पोलीस आणि एफसीच्या पथकांनी लगेचच सर्च ऑपरेशन सुरू केले. आज सकाळपर्यंत 78 कैद्यांना पकडण्यात आले होते. कराचीत अनेक चेक पॉइंट तयार करण्यात आले. हायवेवर शोध मोहीम राबवण्यात आली. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कराचीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी काशिफ अब्बासी यांनी सांगितले की तुरुंगातून जे कैदी फरार झाले आहेत त्यात कुणावरही गंभीर गुन्हे किंवा अतिरेकी म्हणून खटले चालवण्यात आलेले नाहीत. 2013 नंतर देशातील कारागृहांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला रशियाचे जोरदार प्रत्युत्तर; 24 तासांत 1,430 युक्रेनियन सैनिक ठार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube