‘किंग’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान शाहरूख खान जखमी; उपचारांसाठी अमेरिकेला रवाना

‘किंग’ सिनेमाच्या शुटिंगदरम्यान शाहरूख खान जखमी; उपचारांसाठी अमेरिकेला रवाना

Shahrukh Khan Injuerd during King Film Shooting go to America for treatment : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. किंग असं या त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. मात्र याच दरम्यान सेटवर शाहरूख जखमी झाला आहे. बॉलिवूड हंगामा यांच्या वृत्तानुसार चित्रपटातील अॅक्शन सीन दरम्यान शाहरूखच्या स्नायुंना दुखापत झाली आहे. त्यासाठी आता शाहरूख उपचार घेण्यासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. ही दुखापत गंभीर नाही मात्र त्याला डॉक्टरांनी एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

‘भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण’; अजितदादांच्या शिलेदाराचं मोठं विधान

त्याचबरोबर बॉलिवूड हंगामा यांच्या सुत्रांनी हे देखील सांगितलं की, शाहरूखच्या दुखापतीबाबत पुर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याची टीम त्याच्यासोबत अमेरिकेला रवाना झाली आहे. ही दुखापत गंभीर नाही. पण त्याच्या स्नायुंमध्ये दुखापत झाली आहे. दरम्यान या अगोदर देखील शाहरूखला चित्रपटांच्या शुटींगदरम्यान स्टंट करताना अनेकदा स्नायूंसंबंधी दुखापत झाली आहे.

उद्धव ठाकरे यांचं सरकार कशामुळं कोसळलं; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा

त्याचबरोबर अशी देखील माहिती समोर आली आहे की, शाहरूखला डॉक्टरांनी एक महिना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.त्यामुळे आता या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यत्यय आल्याने शुटींग लांबले आहे. आता या चित्रपटाचं शुटींग सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. तोपर्यंत शाहरूखचा प्रकृती पुर्ण ठीक झालेली असणार आहे. अशी माहिती दिली जात आहे.

मुल होत नाही, दारू सुटत नाही म्हणून करायचा अघोरी उपचार; लघुशंका पाजणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड

याअगोदर 2024 मध्ये देखील शाहरूख त्याच्या डोळ्यांच्या इलाजासाठी अमेरिकेला गेला होता.21 मे 2024 ला अहमदाबादमध्ये त्याची टीम कोलकाता नाईट रायडर्सच्या एका सामन्यादरम्यान त्याला हीट स्ट्रोक झाला होता. त्यावेळी त्याला भारतात रूग्णालयात दाखल केलं होतं. पण त्याला तेव्हा देखील अमेरिकेमध्ये दाखल करावं लागलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube