भिनेत्री प्रार्थना बेहेरेवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचं रस्त्ये अपघातात निधन

अभिनेत्री प्रार्थनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे.

News Photo (76)

News Photo (76)

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचा रस्त्ये अपघातात मृत्यू झाला आहे. (Film) प्रार्थनाने सोशल मीडियावर वडिलांचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 14 ऑक्टोबर रोजी प्रार्थनाच्या वडिलांचे निधन झाले आहे.

प्रार्थनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडिलांचा फोटो शेअर करत, “मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है.. माझे बाबा …. १४ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन दुर्दैवाने एका road अपघातात झाले. बाबा ……. तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय. तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो” असं म्हटलं आहे.

अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नवा लूक चर्चेत! भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसणार…

तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं. तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे. आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात. तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल परवा पर्यंत सगळ अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत.

प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे. पण या सगळ्या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहीलं तर, तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ रहाणार आहात. कारण तुम्ही स्मरणात रहाणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय. तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत रहाणं, हे माझं कर्तव्य आहे.

डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे. काळजी करू नका… मी खुप strong आहे. कारण माझ्या पाठीशी नाही तर, तुम्ही सोबत आहात याची खात्री आहे असे पोस्टच्या शेवटी ती म्हणाली.

Exit mobile version