Priya Marathe Passed Away Shweta Pendse Emotional Post : मराठी मालिकांतून आणि रंगभूमीवर आपली छाप पाडणाऱ्या अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe Passed Away) यांचे निधन झाले आहे. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीत (Entertainment News) हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रिया मराठे या मालिकांमधील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या ओळखीच्या झाल्या होत्या. त्यांचा साधा, गोड आणि उत्साही स्वभावामुळे सहकाऱ्यांच्या मनातही त्यांचं खास स्थान होतं. नाटक, मालिका आणि इतर कलाक्षेत्रातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग देत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
Manoj Jarange Patil : मोठी बातमी, आंदोलकांचा शेअर मार्केटमध्ये घुसण्याचा प्रयत्न
कितीही आव्हानं आली तरी…
अभिनेत्री श्वेता पेंडसे यांनी (Shweta Pendse) सोशल मीडियावर भावनिक आठवणी शेअर केल्या. त्यांनी लिहिलं की, जयोस्तुते मालिकेतून प्रिया प्रथम भेटली आणि तिचा आत्मविश्वास व गोड स्वभाव लक्षात राहिला. ती नेहमीच उत्साहाने भरलेली असायची. सेटवर तिच्यासोबत घालवलेले क्षण, वाढदिवसाचा केक कापताना झालेला आनंद, हे सगळं डोळ्यांसमोर आहे. प्रियाने नेहमीच आपल्याला शिकवण दिली की आयुष्यात कितीही आव्हानं आली तरी हसत राहावं.
राज्य नाट्य स्पर्धा: प्रवेशिका सादर करण्यासाठी आता 10 सप्टेंबरपर्यंतची संधी
खूप प्रेमाने जगायला…
श्वेताने पुढे लिहिले की, आयुष्य खरंच अनिश्चित आहे. एखादं नातं किंवा भेट कायमची अपूर्ण राहू शकते. म्हणूनच आपण भेटतो तेव्हा प्रेमानं भेटायला हवं. प्रिया गमावणं ही खूप मोठी पोकळी आहे. आला क्षण कोणाबद्दल कोणतही किल्मिश न ठेवता खूप प्रेमाने जगायला हवा. भरभरून जगायला हवा. प्रिया, मला तुझी खुप आठवण येईल. नेहमीच! खूप छान भूमिका तुझ्या वाट्याला आल्या असत्या. तू एक अत्यंत गुणी अभिनेत्री होतीस. त्याहीपेक्षा एक खूप प्रेमळ आणि उत्तम माणूस होतीस.
प्रिया मराठे यांच्या जाण्याने मराठी मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार, सहकारी व चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मराठी नाटक आणि मालिकांना त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील.