राज्य नाट्य स्पर्धा: प्रवेशिका सादर करण्यासाठी आता 10 सप्टेंबरपर्यंतची संधी

राज्य नाट्य स्पर्धा: प्रवेशिका सादर करण्यासाठी आता 10 सप्टेंबरपर्यंतची संधी

Rajya Natya Spardha Entries : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत (Rajya Natya Spardha) सहभागी होण्यासाठी प्रवेशिका सादर करण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ (Ashish Shelar) देण्यात आली आहे. याअंतर्गत विविध वर्गवारीतील प्रवेशिका (Entertainment News) आता 10 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करता येणार आहेत.

प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख

यापूर्वी प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. मात्र गणेशोत्सवाचे आगमन, पावसाचे आव्हान आणि इतर विविध कारणांमुळे काही नाट्यसंस्था व संघटनांना वेळेत प्रवेशिका सादर करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे या संस्थांकडून सांस्कृतिक कार्य विभागाकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित मागणी मान्य करण्यात आली. त्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व नाट्यसंस्था आणि संघटनांना आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

आनंदाची बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, आजपासून नवीन दर लागू होणार

महत्त्वाची स्पर्धा

राज्य नाट्य स्पर्धा ही महाराष्ट्रातील रंगभूमीच्या परंपरेला चालना देणारी आणि नवोदित तसेच प्रस्थापित नाट्यसंस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. त्यामुळे या मुदतवाढीमुळे अधिकाधिक संस्थांना सहभाग घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

आजपासून पाणी बंद! जरांगे पाटलांचा मोठा निर्णय; आझाद मैदानावर मराठा आंदोलन तापलं, उपोषणाचा चौथा दिवस

प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ

जास्तीत जास्त संघाना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी, प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली होती. या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास दिनांक 10 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

10 सप्टेंबरपर्यंत अर्ज

या मुदतवाढ निर्णयाच्या अनुषंगाने, राज्य नाट्य वर्गवारींच्या स्पर्धांत भाग घेण्यास इच्छुक असलेले संघ, ऑनलाइन पद्धतीने दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करू शकतील असे प्रसिद्धीपत्रक सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. संबंधित संघानी https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube