Rakhi Sawant: सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणतंही कुटुंब महागाईच्या झळांपासून वाचलेलं नाही. तसेच कुटुंबाच्या एका महिन्याचा जीवनावश्यक वस्तूंवरचा खर्च हा ३-४ हजारांनी वाढलेला आहे. हे खर्च जरी वाढत असला, तरीही महिन्याचं उत्पन्न तर वाढत नाही ना. कारण सध्या महागाई (Inflation) खूप वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांमध्ये अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत.
आता टोमॅटोच्या (tomato) किमतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. टोमॅटो इतके महाग झाल्याने नागरिकांसोबत अनेक कलाकारांच्या देखील भुवया उंचावले आहेत. आता टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीबद्दल राखी सावंत नाराज झाली आहे. अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच काहींना काही कारणाने चांगलीच चर्चेत येत असते. ती आजूबाजूला घडणाऱ्या जवळपास सर्व गोष्टींविषयी अगदी सडेतोडपणे प्रतिक्रिया देत असताना दिसून येत आहे.
आता तिने टोमॅटोच्या वाढत्या भावावर मोठं वक्तव्य जेके आहे. तसेच राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये ती मीडिया फोटोग्राफरशी संवाद साधत असल्याचे दिसून आली आहे. यावर राखी म्हणते, “खरंच टोमॅटो किती महाग झाले आहेत. टोमॅटो ही काय महाग करण्याची गोष्ट आहे का? आता मी टोमॅटोची चटणी कशी खाणार?
Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले
तुम्हीच सांगा माझी टोमॅटोची चटणी आणि माझे सॅलेड कसं करणार? आता राखीचं हे बोलणं सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत होत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओवर देखील कमेंट करत चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी तिच्या बोलण्याला पाठिंबा दिला आहे.