Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले

Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले

Trial Period teaser: अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुख अनेक दिवसांनंतर आलेल्या वेड या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेमाचा वर्षाव केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा जेनेलिया तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. यावेळी ती आता फादर ऑन रेन्ट म्हणजे भाड्याने वडिल शोधत आहे. नेमका हा प्रकार आहे जाणून घेऊ… ( Genelia Deshmukh Search for Father on rent in her upcoming film Trial Period teaser )

View this post on Instagram

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

जेनेलिया देशमुख आगामी चित्रपट ट्रायल पिरीयडमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये ती भाड्याने वडिलांचा शोध घेत आहे. त्यासाठी तिने अनेकांच्या मुलाखती देखील घेतल्या आहेत. या टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे. त्यावर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

NCP : “जमिनीपेक्षा आपलं ‘विमान’ हवेतच असायचं; बहुतेक वेळा तर…” : पवारांचा नातू पटेलांना भिडला

या चित्रपटामध्ये जेनेलिया देशमुख आणि मानव कौल दे दोघे मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाची कथा उत्कृष्ट असल्याचं या टीझरवरून लक्षात येत आहे. जेनेलिया या चित्रपटामध्ये भाड्याने वडिलांचा शोध घेत आहे. त्यात ती मानव कौलची निवड करते. 21 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शिंदेंचं बंड, फडणवीसांची उचलबांगडी अन् आता राष्ट्रवादीला भगदाड; भूकंपांमागील खरा चाणक्य कोण?

या चित्रपटाचं दिग्दर्शन अलेया सेन, निर्माती ज्योती देशपांडे त्याचबरोबर अलेया सेन, हेमंत भंडारी, अमित शर्मा यांचं देखील नाव या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये आहे. तर या चित्रपटामध्ये जेनेलिया देशमुख आणि मानव कौल दे दोघे मुख्य भूमिकेत असणार आहेत. दरम्यान जेनेलियाच्या वेड चित्रपटानंतर तिला चाहते पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube