Gum Hai Kisike Pyaar Mein : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ (‘Gum Hai Kisike Pyaar Mein’) छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिका आहे. आता ही मालिका नवीन रोमांचक वळणावर पोहोचीये. या मालिकेत भावनिक नाट्य, ट्विस्ट आणि खोल आणि तितक्याच तीव्र भावनांची झलक पाहायला मिळेल. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलीये. या प्रोमोची खासियत आहे – दिग्गज अभिनेत्री रेखा (Actress Rekha) आणि तिचा आवाज.
SL vs AUS: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास, मोडला रिकी पॉन्टिंगचा खास विक्रम
दिग्गज अभिनेत्री रेखाचे प्रोमोमध्ये दिसणे ही प्रेक्षंकासाठी आनंदाची बाब आहे. रेखाचा अतुलनीय आणि भावनिक आवाजाने प्रोमोला खास बनवलंय. हा आवाज कथेत एक वेगळीच खोली भरतो. रेखाचा आवाज तेजस्विनीचा भूतकाळ आणि वर्तमान यांच्यात अडकलेला प्रवास दाखवतो. तेजस्वीनीचे नीलसोबत लग्न जुळतेय, अशाचत तिचा पहिलं प्रेम ऋतुराज परत येतोय, असा ट्रॅक असणारी ही कथा प्रेक्षकांना खोलवर स्पर्श करेल. रेखाचा आवाज हा प्रवास आणखी भावनिक आणि संस्मरणीय बनवत आहे, जो शोला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातो.
या मालिकेत वैभवी हंकारे (तेजस्विनी), सनम जोहर (ऋतुराज) आणि परम सिंह (नील) या नवीन कलाकारांचा समावेश आहे. हे सर्वजण त्यांच्या दमदार अभिनया साकारत आहेत.
दिग्गज अभिनेत्री रेखा बोलताना म्हणाली, “गुम है किसीके प्यार में’ हे गाणं नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या मालिकेत मानवी भावना, प्रेम, कर्तव्य, कुटुंब आणि उत्कटतेच्या पैलूंमध्ये खोलवर जाणारी कहाणी पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे शीर्षक गीत ‘गुम है किसी के प्यार में’ मला शांती देते. या शोशी माझे नाते प्रेमळ आणि आदरयुक्त राहिले आहे आणि मी प्रेक्षकांसाठी संस्मरणीय क्षण निर्माण करण्यास उत्सुक आहे.
SL vs AUS: स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास, मोडला रिकी पॉन्टिंगचा खास विक्रम
दरम्यान, रेखा ही केवळ बॉलिवूडची सदाबहार सौंदर्यवतीच नाही तर ऱेखा आणि तिचा आवाज कोणत्याही कथेला जीवतंपणा प्राप्त करून देतो. या शोच्या प्रोमोमध्ये रेखा दिसत आहे. तिचा आवाजाने शोचा उत्साह आणखी वाढला आहे!
दरम्यान, ‘गुम है किसीके प्यार में’मधील भाविका शर्मा आणि हितेश भारद्वाज यांनी शो सोडला आहे. त्यांनी मालिकेत सावी आणि रजतची भूमिका साकारली होती.
प्रोमोमधील भूमिकेसाठी रेखाने नेमके किती शुल्क घेतले हे निश्चित नसले तरी, उद्योगातील एका अंतर्गत सूत्राने सांगितले की, गुम है किसीके प्यार में मधील तिच्या कॅमिओसाठी रेखाने सुमारे ८ ते १० कोटी रुपये घेतले.