अभिनेत्री सई ताम्हणकरचा बॉलिवूडमध्येही वेगेळेपणा कायम; ‘द सीक्रेट ऑफ शिलेदार्स’च्या यशानंतर आता…

सईचा बॉलिवूड प्रोजेक्ट्स चा सिलसिला असाच सुरू राहणार असून डब्बा कार्टेल नंतर सई आगामी " क्राईम बीट " या वेब सीरिज

अभिनेत्री सई ताम्हणकरचा बॉलिवूडमध्येही वेगेळेपणा कायम; 'द सीक्रेट ऑफ शिलेदार्स'च्या यशानंतर आता...

अभिनेत्री सई ताम्हणकरचा बॉलिवूडमध्येही वेगेळेपणा कायम; 'द सीक्रेट ऑफ शिलेदार्स'च्या यशानंतर आता...

Actress Sai Tamhankar : कामाचं सातत्य आणि वैविध्यपूर्ण भूमिकांची योग्य निवड करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर २०२५ मध्ये तिच्या बॅक टू बॅक बॉलिवुड प्रोजेक्ट्स सोबत ती अनेक वेगळ्या (Tamhankar ) धाटणीच्या भूमिका देखील करताना दिसतेय. नुकतीच सई द सीक्रेट ऑफ शिलेदार्स मध्ये दिसली होती आणि आता ती पुन्हा एक बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये दिसण्यासाठी सज्ज होत आहे.

“द सीक्रेट ऑफ शिलेदार्स ” च्या दमदार यशा नंतर सई पुन्हा बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये खास भूमिका साकारणार आहे. सईच्या लक्षवेधी भूमिका या नेहमीच बॉलिवुड प्रेक्षकांना मोहित करतात अश्यातच सईची बहुचर्चित डब्बा कार्टेल वेब सीरिज या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Tamhankar : सई ताम्हणकरचा जलवा, पाहा हॉट अंदाज..

डब्बा कार्टेल चा टीझर हा उत्सुकतावर्धक तर आहे पण यात गोष्ट आहे ती टिफीन सर्व्हिस चालवणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांची. या महिला दिसायला साध्याभोळ्या असल्या तरीही त्या त्यांच्या टिफिन सर्व्हिसमधून मोठा स्कॅम करताना दिसतात. सईया वेबसीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

सईचा बॉलिवूड प्रोजेक्ट्स चा सिलसिला असाच सुरू राहणार असून डब्बा कार्टेल नंतर सई आगामी ” क्राईम बीट ” या वेब सीरिज मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे सई या वर्षात कायम वेगवेगळ्या भूमिका तर साकारत असून तिच्या प्रोजेक्ट् चे विषय देखील तितकेच खास आहेत. धाडसी, महत्त्वाकांक्षी, निर्भय भूमिका करणारी सई येणाऱ्या काळात नक्की काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

आव्हानात्मक भूमिका साकारण्यापासून ते स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन भूमिका करण असो सई प्रत्येक भूमिकांना योग्य न्याय देऊन त्या चोख आणि तितक्याच ताकदीने उत्तमपणे साकारते. सईचा बॉलिवूड प्रवास इथेच न थांबता येणाऱ्या काही दिवसात सई डब्बा कार्टेल, ग्राउंड झीरो, मटका किंग अश्या अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मधून हिंदी आणि मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

 

Exit mobile version