Download App

Shilpa Shetty: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अभिनेत्रीचे रोखठोक मत; म्हणाली, ‘CM शिंदे…’

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आता बॉलिवूड अभिनेत्रीने आपले मत व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.

  • Written By: Last Updated:

Shilpa Shetty On Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: सध्या राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची सर्वत्र (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चांगलीच चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांच्या खात्यात प्रति महिना 1500 रुपये जमा करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 2 महिन्यांचे 3 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर आता अनेक कलाकार याबद्दलचं त्यांचं रोखठोक मत मांडताना दिसत आहेत. त्यातच आता बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) आपले रोखठोक मत व्यक्त केले आहे.

Ayushmann Khurrana Poem On The Kolkata Rape Murder Case: मी जर मुलगा असते तर... | LetsUpp Marathi

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ‘मु्ख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे तो तोंडभरून कौतुक केले आहे. राज्य सरकारचा या निर्णयाचा स्वागत केले आहे. राज्यातील महिलांना दिलासा देणारे असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. शिल्पा शेट्टीने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे की, राज्यात दीड कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेमुळे मोठा आधार मिळाला आहे. या महिलांना दर महिन्याला आर्थिक आधार मिळणार आणि राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे, याचा आनंद बघायला मिळत असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे.

काय आहे पोस्ट?

‘लाडकी बहीण योजने’मुळे राज्य सरकारने हे उचललेले पाऊल म्हणजे महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही मोठी झेप आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन अशी पोस्ट अभिनेत्रीने केली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. नुकतच सरकारने या योजनेच्या नियमात अनेक महत्वाचे बदल करण्यात आला आहे. यातील एका महत्वाचं बदल राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे.


अटी आणि लाभार्थी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील कमीतकमी 2,50,500 महिलांना याचा फायदा होणार असल्याची माहिती आहे.

Shilpa Shetty अन् राज कुंद्रावरील फसवणुकीच्या आरोपावर वकीलाचं स्पष्टीकरण, म्हणाले

कोणत्या महिलांना फायदा होणार ?

1) ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा त्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी असणे गरजेचे आहे.

2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला योजनेचा लाभ घेऊ शकता

3) महिला या योजनेचा लाभ वयाच्या 21 व्या वर्षापासून ते 60 व्या वर्षापर्यंत घेऊ शकणार आहेत.

4) योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.

5) जय महिलांना योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं

follow us