सोनाक्षी आणि झहीर अडकले विवाह बंधनात, मोजक्याच नाईवाईकांच्या उपस्थितीत झाला सोहळा, पाहा फोटो…

सोनाक्षी सिन्हाआणि अभिनेता झहीर इक्बाल हे लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान, आज सोनाक्षी झहीर इक्बालसोबत विवाह बंधनात अडकली

Sonakshi Sinha Wedding चे खास फोटो; सोनाक्षी-झहीरकडून नव्या प्रवासाला सुरूवात

सोनाक्षीने लग्नात सुंदर ऑफ व्हाइट साडी नेसली होती. तर झहीरने सोनाक्षीला मॅचिंग करण्यासाठी व्हाइट रंगाची शेरवाणी परिधान केली होती.

Sonakshi Sinha Wedding: गेल्या काही वर्षापासून शत्रुघ्न सिन्हा यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बा (Zaheer Iqbal) हे रिलेशशीपमध्ये होते. ते लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. दरम्यान, आज सोनाक्षी झहीर इक्बाल सोबत विवाह बंधनात अडकली आहे. नोंदणी पद्धतीने दोघांनी लग्न करून त्यांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली.

काही लोकांना बांबूच लावला पाहिजे, CM शिंदेंचे संजय राऊतांवर टीकास्त्र 

बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी आणि झहीर यांनी लग्न केलं.
सोनाक्षी आणि झहीरचा विवाह सोहळा दोन्ही कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडला. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाआधीचे विधी शुक्रवारपासून सुरु झाले होते. पहिल्या दिवशी मेहंदी सोहळा पार पडला. यानंतर शनिवारी सोनाक्षीच्या घरी म्हणजेच मुंबईतील ‘रामायण’ बंगल्यात खास पूजा ठेवली होती आणि आज दोघांनी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षीने लग्नात सुंदर ऑफ व्हाइट साडी नेसली होती. ज्याला मॅचिंग चोकर, कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. तसंच केसात गजरा माळला होता. तर झहीरने सोनाक्षीला मॅचिंग करण्यासाठी व्हाइट रंगाची शेरवाणी परिधान केली होती.

पुणे ड्रग्ज प्रकरणी हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस अ‍ॅक्शनमध्ये 

या लग्नातील खास क्षणांचे फोटो शेअर करून सोनाक्षीही आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिली. तिनं लिहिलं की, सात वर्षांपूर्वी (23.06.2017) आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिलं आणि ते प्रेम टिकवण्याचा निर्णय गेतला. आज त्या प्रेमानं आम्हाला सर्व आव्हानांमध्ये व यशामध्ये मार्गदर्शन केलं. तसंच या क्षणापर्यंत नेलं आहे. आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि दोन्ही देवांच्या आशीर्वादाने, आम्ही आता पती-पत्नी आहोत…सोनाक्षी आणि झहीर…23.06.2024, असं सोनाक्षीनं लिहिलं.

दरम्यान, आता मुंबईतील दादर भागातील बस्टियन रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी होणार आहे. या पार्टाीला अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

सोनाक्षी आणि झहीरची प्रेमकहाणी

सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सोनाक्षी आणि झहीरची पहिली भेट बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत झाली होती. त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाला. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सोनाक्षी आणि झहीरने ‘डबल एक्सएल’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कुबली दिली होती.

Exit mobile version