काही लोकांना बांबूच लावला पाहिजे, CM शिंदेंचे संजय राऊतांवर टीकास्त्र

काही लोकांना बांबूच लावला पाहिजे, CM शिंदेंचे संजय राऊतांवर टीकास्त्र

Eknath Shinde On Sanjay Raut :विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा सध्या जोरात प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) प्रचारात व्यस्त आहेत. महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्चचारी, मुख्याध्यापकांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती. त्या टीकेला आता त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं

पुणे ड्रग्ज प्रकरणी हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस अ‍ॅक्शनमध्ये 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एका कार्यक्रमात बांबूचे महत्व पटवून देतांना राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, बांबू हा ऑक्सिजन अधिक देणारा आणि कार्बन डायऑक्साइड अधिक प्रमाणात शोषून घेणारा आहे. बांबूचे एवढे बायो प्रॉडक्ट आहेत की, आपण विचारही करू शकणार नाही. त्यामुळे बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. तसेच काही लोकांना बांबूही लावायला पाहिजे. काही लोक असे असतात जे सकाळीच भोंगा वाजवतात, असं शिंदे म्हणाले.

पुणे ड्रग्ज प्रकरणी हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिस अ‍ॅक्शनमध्ये 

राऊत काय म्हणाले?
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकचा दौरा केला. त्यावरून राऊतांनी टीका केली होती. मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाणे भाव लागवत असतील तर या परंपरेला मोठा तडा गेल्याचे दिसत आहे. शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील. शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना बाजारात उभे करू नका, असं राऊत म्हणाले होते.

तत्पूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहींनी मतदान केले. त्यामुळेच त्यांचा विजय जाला. पण ही तात्पुरती गोष्ट आहे, कायमस्वरूपी नाही. लोकांची दिशाभूल करून महाविकास आघाडीने मते मिळवली. लोकांची वारंवार दिशाभूल करता येणार नाही. येत्या निवडणुकीत महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार की नाही? हा एक प्रश्न आहे. की घाबरून दुसरा शोधतात, हे पाहावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube