राष्ट्रपती भवनातील पहिल्या-वहिल्या विवाहास मुर्मुंचा हिरवा कंदिल; विवाहबद्ध होणाऱ्या पुनम गुप्ता कोण?
Wedding Ceremony at Rashtrapati Bhavan : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपती भवनामध्ये (Rashtrapati Bhavan) एक विवाह सोहळा (Wedding Ceremony) पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी परवानगी दिली आहे. राष्ट्रपती भवनाच्या मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अत्यंत निवडक लोकांमध्ये आणि सुरक्षेसह हा विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र थेट राष्ट्रपती भवनामध्ये विवाहबद्ध होणाऱ्या पूनम गुप्ता कोण आहेत? असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. जाणून घेऊ पुनम गुप्ता कोण आहेत?
पुनम गुप्ता कोण आहेत?
पुनम गुप्ता या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) महिला अधिकारी आहेत. त्या सध्या राष्ट्रपती भवनामध्ये वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) म्हणून कार्यरत आहेत. पुनम या जम्मू काश्मीर येथे असिस्टंट कमांडर असलेल्या अवनिश कुमार यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. 12 फेब्रुवारी 2025 रोजी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. तेव्हा सोहळ्याला त्यांच्या कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्यातील निवडक लोक हजेरी लावणार आहेत.
‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचा धमाल टिझर भेटीला, ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट
तसेच पूनम यांच्या बद्दल सांगायचं झालं तर त्या मध्यप्रदेशातील शिवपुरीतील श्रीराम कॉलनीतील रहिवासी आहेत. नवोदय विद्यालयात कार्यरत असलेले कार्यालयीन अधिक्षक रघुवीर गुप्ता यांच्या कन्या आहेत. त्यांनी 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं नेतृत्व केलं होतं. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी देखील विलक्षण आहे.
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तरीही गुंतवणूकदार नाराज; ‘हे’ आहे कारण
त्यांनी गणितामध्ये पदवी संपादन केले आहे. तसेच इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण घेऊन ग्वालियर येथील जिवाजी विद्यापीठातून बीएड देखील पूर्ण केलं आहे. तर 2018 मध्ये त्यांनी यूपीएससीच्या सीएपीएफमध्ये 81 वी रँक मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी बिहारमधील नक्षली भागात आपले कर्तव्य पार पाडले. सध्या त्या राष्ट्रपती भवनात कार्यरत आहेत. तर राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु या पुनम यांच्या कामाने खूप प्रभावित आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाचं कळताच राष्ट्रपतींनी हा विवाह सोहळा आयोजित करण्याची परवानगी दिली.