Wedding Ceremony : वनिता खरातच्या हळदीला ‘हास्यजत्रा’

Untitled Design   2023 02 02T165132.175

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतात. सोशल मिडीयावरही या कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे. यातच या कार्यक्रमातील एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे वनिता खरात.

वनिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड सुमीत लोंढेसह ती संसार थाटणार आहे. तिच्या लग्नसोहळ्याच्या विविध विधींचे फोटो आणि व्हिडीओ आता समोर येत आहेत. नुकतेच वनिताच्या हळदी समारंभाचे काही खास क्षण समोर आले. वनिता आणि सुमीतने हळदी समारंभाचा आनंद मनसोक्त लुटलाय.

हा आनंद द्विगुणीत करायला महाराष्ट्राची हास्यजत्रामधील त्यांची मित्रमंडळी पोहोचले. या कलाकारांनीदेखील वनिताच्या हळदी समारंभात धमाल केलीय. नम्रता संभेरावने देखील आपल्या मैत्रिणीच्या हळदीला मजा केलीय. या समारंभाचे फोटो देखील तिने सोशल मिडीयावर शेयर करत आमच्या वनी आणि सुमितची हळद असं कॅप्शन दिलय. तर ईशा डे, रोहीत, प्रियदर्शनी, ओमकार राऊत, चेतना यासह अनेक कलाकार या हळदीला हजर राहिले.

वनिता आणि रोहितने यावेळी मॅचिंग पांढऱ्या रंगाची कुर्ती आणि ड्रेस परिधान केले होते. वनिता आणि रोहितच्या हळदी समारंभाचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर लक्ष वेधून घेत आहेत. तेव्हा वनिता आणि रोहितच्या लग्नाची देखील उत्सुकता आहे. या लग्नात दोघं काय परिधान करतील ? कोण कलाकार यावेळी उपस्थित असतील ? यासह वनिता आणि रोहितचा आनंद गगनात मावेनासा असेल एवढं नक्की.

Tags

follow us