Download App

Tamannaah Bhatia: तमन्नाने जपानच्या ट्रेलर लाँचमध्ये कार्तीला तमिळ शिकवल्याबद्दल मानले आभार

Tamannaah Bhatia Japan trailer Memories : पॅन-इंडिया स्टार म्हणून जी अभिनेत्री सध्या टॉप लिस्ट वर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia ) ! ‘जी करदा’ आणि लस्ट स्टोरीज 2 मधल्या (Lust Stories 2) तिच्या अभिनयामुळे ती पुन्हा चर्चेत आली. आता तमन्ना भाटियाने (Tamannaah Bhatia) जपानच्या ट्रेलर लाँचच्या (Japan Trailer) वेळी तिच्या 75-चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि कार्तीसोबतच्या (Karthi) तिच्या बाँडबद्दल केली खास गोष्ट सांगितली.


तमन्ना भाटियाने तिच्या आगामी चित्रपट ‘जपान’ च्या ट्रेलर लाँचमध्ये (Japan Trailer) सहभाग घेतला होता. यामध्ये ती कार्ती आणि अनु इमॅन्युएल सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. जपान ट्रेलर लाँच दरम्यान तमन्नाने तिच्या 75 चित्रपटांच्या शानदार कारकिर्दी बद्दल अनेक खास गोष्टी शेअर केल्या ‘पैय” मध्ये काम करताना तिला तमिळ शिकवणाऱ्या कार्तीबद्दल तिने मनापासून आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. शूटिंगच्या दरम्यान अनुभव खरोखरच संस्मरणीय बनवल्याबद्दल तिने कार्तीचे आभार मानले आहे.

“जपान” च्या पलीकडे तमन्नाच्या आयुष्यामध्ये आगामी “बांद्रा” हा सिनेमा महत्वाचा ठरणार आहे. सोबतच तिचा उत्सुकतेने अपेक्षीत तमिळ सिनेमा ‘अरनमानाई 4’ 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तिच्या कारकिर्दीत आणखी एक उत्साह वाढवताना, ती निखिल अडवाणीच्या “वेद” मध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये ती जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे.

Nagraj Manjule Naal 2: नागराज मंजुळेंच्या ‘नाळ 2’मधील नवं धमाकेदार गाणं प्रदर्शित

दरम्यान, 2023 चे स्वागत करत असताना विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांचा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर ‘लस्ट स्टोरी 2’ च्या प्रमोशन दरम्यान देखील विजय आणि तमन्ना एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आला होतं. आता बॉलीवूडच्या या नव्या जोडीला चाहत्यांनीही मोठी पसंती दिली आहे.

Tags

follow us