Tamannaah Bhatia: विजय वर्मासाठी तमन्ना भाटियाने मोडला 18 वर्षांपासूनचा ‘नो किसिंग’ नियम

Tamannaah Bhatia: विजय वर्मासाठी तमन्ना भाटियाने मोडला 18 वर्षांपासूनचा ‘नो किसिंग’ नियम

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियानं (Tamannaah Bhatia) साऊथसह बॉलिवूडमध्ये देखील अभिनयाच्या जीवावर मोठी ओळख निर्माण केली आहे. सध्या तमन्ना तिच्या लव्ह लाईफमुळे (love life) जोरदार चर्चेत येत आहे. गेल्या काही दिवासापसरून तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. विजय वर्माला (Vijay Verma) डेट करत असल्याचे तिनं एक हिंट देखील दिली आहे. जवळ- जवळ तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)


‘लस्ट स्टोरीज 2 ‘मध्ये (Lust Stories 2) ती विजय वर्माबरोबर दिसून येणार आहे. तर दुसरीकडे तमन्ना 18 वर्षांपेक्षा जास्त काळ अभिनय विश्वामध्ये काम करत आहे, आणि तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ती नेहमीच साध्या आणि सरळ भूमिका करताना असताना दिसून येत असते. तमन्ना आजपर्यंत पडद्यावर किसिंग सीन्स किंवा ओव्हर-रोमँटिक सीन्स (Romantic scene) करत असल्याचे कधीही दिसून आली नाही, पण आता या अभिनेत्रीने स्वत:च तिचा 18 वर्षांचा नियम मोडला आहे.

अभिनेत्री अद्याप ऑन स्क्रीन किसिंग सीन देत असल्याचे दिसून आली नाही. लस्ट स्टोरी 2 मध्ये तमन्नाने नुकतेच तिच्या नो किसिंग पॉलिसीवर आपले मौन तोडले आणि 18 वर्षांनंतर तिने स्वत: चा नियम का तोडला हे स्पष्ट केले आहे. तमन्ना भाटियाने ‘नो किसिंग पॉलिसी’ तोडण्याच्या निर्णयाबद्दल म्हणाली की, ‘मी अशा लोकांपैकी एक होते जे नेहमी म्हणत पडद्यावर इंटिमेट सीन्स बघितल्यानंतर म्हणतात मी असे कधीच करणार नाही.

मी कधीही कुणाला ऑनस्क्रीन किस करणार नाही. खरं तर मला यातून बाहेर पडायचे होते, असे देखील तमन्नाने यावेळी स्पष्ट केले आहे. तमन्ना पुढे म्हणाली की, माझ्या करिअरच्या इतक्या वर्षामध्ये मी कधीही इंटिमेट सीन दिले नाहीत किंवा फार कमी इंटिमेट सीन केले आहेत. परंतु लस्ट स्टोरीमधील कथेच्या मागणीमुळे मला ते कराव लागल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. यामुळे असं नाही की 18 वर्षानंतर असा सीन देऊन मी प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे. तमन्ना सध्या विजय वर्माला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये ती विजय वर्मासोबत अभिनय करत आहे. विजयच्या प्रेमात तमन्नाने तिचा किस न करण्याचा नियम देखील मोडला आहे. तमन्नाने याविषयी सांगितले आहे की, तिने केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिचा नियम मोडला नाही. हा पूर्णपणे क्रिएटिव्ह प्रयत्न केला आहे. लस्ट स्टोरीज 2 व्यतिरिक्त तमन्ना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘जी करदा’ या तिच्या नवीन वेब सीरिजच्या तयारीमध्ये असल्याचे दिसून येत आहे. अरुणिमा शर्मा दिग्दर्शित ‘जी करदा’मध्ये तमन्ना भाटियासह सुहेल नय्यर, आन्या सिंग, हुसेन दलाल, सायन बॅनर्जी आणि संवेदना सुवालका, सिमोन सिंग आणि मल्हार ठाकर यांच्याही महत्त्वाच्या भमिकेटमधून दिसून येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube