Vani Kapoor : शुध्द देसी रोमांस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी वाणी कपूरने (Vani Kapoor) आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करणारी वाणी आता ह्यूमन नेचर (Human Nature) या ब्रँडचा नवा चेहरा बनली आहे.
नितीश कुमारांनी बहुमत सिद्ध केलं; 130 मते पदरात, विरोधकांचा सभात्याग
या महत्वाच्या प्रवासाला सुरुवात करताना प्रसिद्ध निर्मात्या प्रज्ञा कपूर आणि अभिनेत्री वाणी कपूर दोघी सोबत आल्या आहेत. ह्यूमन नेचर हा फॅशन ब्रँड फक्त फॅशनमध्ये नाही, तर त्या पलिकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारा ब्रँड म्हणून ओळखला जाणार आहे. वाणी कपूर सुद्धा या ब्रँडचा नवा चेहरा बनली आहे.‘ह्युमन नेचर’च्या जाहिरातीसाठी ऑनबोर्ड येत असताना वाणी कपूरने म्हणते, सामाजिक काम करणं हे नेहमीच माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि मी त्यांच्याबद्दल नेहमीच बोलत आले आहे. एक साथ फाउंडेशन दोन मुख्य कारणांमुळे माझ्या हृदयाच्या जवळ आहे. पहिले प्रज्ञा जिच्यावर मी खूप प्रेम करते आणि दुसरे यासाठी मला काम करायला मिळणार आहे.
भाजपकडून निव्वळ अफवा, कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांना ठाम विश्वास
एका उदात्त हेतूने प्रेरित ह्यूमन नेचर एक साथ – द अर्थ फाउंडेशनसाठी आधारस्तंभ म्हणून काम करतो. दरम्यान, निर्मात्या प्रज्ञा कपूरचे बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूरसोबतचे नवीन सहकार्य अर्थपूर्ण बदल घडवून आणणार आहे.
वाणीने आपल्या दहा-बारा वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. चित्रपटांसोबतच ती मॉडेलिंगही करते. तिने अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केले. काही जाहिरातींमध्ये ती दिसला होती. वाणीचा ‘बेफिक्रे’ हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला होता. ‘शमशेरा’, ‘चंडीगढ़ करे आशिकी’, ‘बेलबॉटम’ आणि ‘वॉर’ सारख्या चित्रपटात तिने काम केलंय.