नितीश कुमारांनी बहुमत सिद्ध केलं; 130 मते पदरात, विरोधकांचा सभात्याग

नितीश कुमारांनी बहुमत सिद्ध केलं; 130 मते पदरात, विरोधकांचा सभात्याग

बिहारच्या विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बहुमत सिद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 28 जानेवारीला नितीश कुमार यांनी एनडीएसोबत युती करत नवीन सरकार स्थापन केलं आहे. नितीश कुमारांच्या या कृतीमुळे बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, बिहार विधानसभेत नितीश कुमारांचं बहुमत सिद्ध झालं असून कुमार यांच्या पदरात 130 मते पडली आहेत. तर विधानसभेच्या अध्यक्षपदी नंदकिशोर यादव यांची वर्णी लागली आहे. यावेळी तेजस्वी यादव यांच्यासह विरोधकांनी सभात्याग केल्याचं पाहायला मिळालं.

पक्ष वाढवणाऱ्यांवर अशी वेळ म्हणजे दुर्दैव, काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज चव्हाणांच्या राजीनाम्यावर शिंदेची प्रतिक्रिया

बहुमत सिद्ध करताना विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कुरघोडी शिगेला पोहोचल्याचं दिसून आलं होतं. रविवारी संध्याकाळी जेडीयू विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या आमदारांना संबोधित केले. बिहारच्या विकासासाठी एकजूट राहू असं सांगत जनता दलाचे सर्वच आमदार मंत्री श्रवण कुमार यांच्या निवासस्थानी जमले होते.

Ahmednagar News : साईबाबा संस्थानवर परिवर्तन पॅनलचा विजय; विखे गटाच्या हातून 20 वर्षांची सत्ता निसटली

इंडिया आघाडीसोबत संसार मोडून नितीश कुमारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमारांच्या या निर्णयानंतर मोठा राजकीय भूकंपच झाल्याचं दिसून आलं होतं. भाजपसोबत जात नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. यावेळेस त्यांच्या सोबतीला भाजप आहे. नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपाचे विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

मी सुरुवातीपासूनच भाजपबरोबर होतो. मध्यंतरी आम्ही मार्ग बदलले होते. मात्र आता पुन्हा एकदा एकत्र आलो असून कायमस्वरुपी बरोबर राहणार आहोत. माझ्यासह आठ जणांनी शपथ घेतली आहे. ज्यांची शपथ राहिली आहे त्यांचाही शपथविधी लवकरच होईल. सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा या दोघांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. बिहारच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत भविष्यातही अशाच पद्धतीने काम करत राहणार असल्याचं नितीश कुमारांनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज