Ahmednagar News : साईबाबा संस्थानवर परिवर्तन पॅनलचा विजय; विखे गटाच्या हातून 20 वर्षांची सत्ता निसटली

  • Written By: Last Updated:
Ahmednagar News : साईबाबा संस्थानवर परिवर्तन पॅनलचा विजय; विखे गटाच्या हातून 20 वर्षांची सत्ता निसटली

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) 150 कोटींची उलाढाल असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe) यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यातच दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर विखे गटाच्या हातून 20 वर्षांची सत्ता निसटली आहे. तर कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.परिवर्तन पॅनलने या निवडणुकीत 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवला आहे.

Vallabh Benke Passed Away : राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांना पितृशोक; माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीची मतदान प्रक्रिया रविवारी (11 फेब्रुवारी) पार पडली. त्यानंतर मतमोजणीदेखील पार पडली. साईबाबा कर्मचारी सोसायटीची वार्षिक आर्थिक उलाढाली तब्बल 150 कोटींची आहे त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची होती. तसेच या निवडणुकीमध्ये विखे गटाची तब्बल वीस वर्षांची सत्ता संपुष्टात आल्याने विकण्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

Horoscope Today : ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

ही निवडणूक 17 जागांसाठी झाली त्यामध्ये 53 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं होतं तर 1000 सभासदांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलं. तसेच या निवडणुकीमध्ये विखे गटाला धक्का बसण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्यांचे दोन वेगवेगळ्या पॅनलचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिले होते.

तर दुसरीकडे विठ्ठल पवार यांच्या पॅनलने विखे समर्थक प्रताप कोते यांच्या पॅनलला आव्हान दिले होते. त्यामध्येच विखे पाटलांचे दुसरे समर्थक संस्थेचे माजी चेअरमन राजेंद्र जगताप यांनी देखील पॅनल उभा केल्याने विखे गटाच्या मतांचं विभाजन झाले. त्यामुळे देखील हा मोठा पराभव पत्करावा लागला

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज