Radhakrishan Vikhe : दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; महसूलमंत्र्यांची ग्वाही

  • Written By: Published:
Radhakrishan Vikhe : दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; महसूलमंत्र्यांची ग्वाही

Ahmedngar News : लम्पी आजारात राज्‍यातील सर्व पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्‍ट्र हे एकमेव राज्य आहे. दूध दरामध्‍ये निर्माण झालेल्‍या परिस्थितीवर मार्ग काढण्‍यासाठी सहकारी आणि खासगी दूध संघाची एकत्रिपणे बैठक घेण्यात येईल कोणत्‍याही परिस्थितीत दूध उत्‍पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.

शासन आपल्‍या दारी या उपक्रमांतर्गत महसूलमंत्री विखे पाटील यांनी आज कनकुरी, नादुर्खी खुर्द आणि बुद्रूक या गावातील ग्रामस्‍थांशी संवाद साधून त्‍यांच्‍या समस्‍या जाणून घेतल्‍या. शासन योजनांची माहिती देवून नागरिकांनी उपस्थित केलेल्‍या प्रश्‍नांबाबत तातडीने उपाय योजना करण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी अधिकाऱ्यांना दिल्‍या.

महसूलमंत्री विखे पाटील म्‍हणाले की, दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राज्‍य सरकार गंभीर असून, दूध उत्‍पादक शेतकऱ्यांवर कोणताही अन्‍याय होणार नाही. राज्‍यात लम्पी संकट मोठ्या प्रमाणात आले असताना जनावरांचे मोफत लसीकरण करण्‍याचा निर्णय सरकारने घेतला. ज्‍यांची जनावरे दगावली त्‍यांनाही आर्थिक मदत राज्‍य सरकारने केली असल्‍याचे महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Monsoon 2023 Update: आला रे आला, अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल!

राज्‍यात जनतेच्‍या मनातील सरकार असल्‍याने सर्वच समाजातील घटकांच्‍या हिताचे निर्णय होत आहेत. शासन आपल्‍या दारी या उपक्रमातून शासनाच्‍या निर्णयांचा लाभ सामान्‍य माणसाला होत आहे की नाही याचाही आढावा घेतला जात असून, गावातील समस्‍या सुटण्‍यासाठीही हा उपक्रम महत्‍वपूर्ण ठरला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

शिर्डी आणि परिसरातील युवकांसाठी रोजगाराच्‍या संधी निर्माण करणे हाच आपला प्रयत्‍न असून, येत्या काळात शेती महामंडळाच्‍या जमीनींचा विनीयोग औद्योगिक कंपन्‍या उभारण्‍यासाठी करण्‍यात येणार असून, याबाबतचे नियोजन आता सुरु झाले असल्‍याचे महसूलमंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube