कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टिंग करणार? थेट दिले उत्तर

कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टिंग करणार? थेट दिले उत्तर

Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षांसोबत महाराष्ट्राची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र पक्षात छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यासारखे वरिष्ठ नेते असताना सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टिंग करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जातीय. यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. (Who will Supriya Sule report to after becoming the Executive President?)

सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना रिपोर्ट करणार आहे. राज्यात छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार आहे, असे त्यांनी सांगितले. दिल्लीतील कार्यक्रमात शरद पवार यांनी नवीन कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच पुण्यात आल्या होत्या. अजित पवारांच्या नाराजीवर त्यांनी भाष्य केले आहे.

Supriya Sule : होय, ही घराणेशाहीच आहे पण.. सुप्रिया सुळेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजितदादा नाराज नाहीत. ग्लास आर्धा आहे की भरलेला हे माध्यमांनी ठरवायचे आहे. तुम्हा लोकांना चर्चा करायच्या आहे तर मी जास्त स्पष्टीकरण देणार नाही. मला सत्य माहिती आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यांच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी अजितदादांनी लॉबींग केलं होतं का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की राष्ट्रवादी पक्ष लॉबींगने चालत नाही. हा पक्ष चर्चेतून चालतो. पक्षात दडपशाही नाही, लोकशाही आहे. त्यामुळे पक्षात जे काही निर्णय होतात ते सर्वांशी चर्चा करुन होतात, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube