Vallabh Benke Passed Away : राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांना पितृशोक; माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

Vallabh Benke Passed Away : राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांना पितृशोक; माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन

Vallabh Benke Passed Away : जुन्नरचे माजी आमदार वल्लभ दत्तात्रय बेनके (Vallabh Benke) यांचे प्रदिर्घ आजाराने निधन (Passed Away) झाले. सध्या त्यांचे पुत्र अतुल बेनके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यांच्या पश्चात पुत्र डॉ. अतुल बेनके, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंड असा परिवार आहे. आज सायंकाळी 4 वाजता हिवरे बुद्रूक या त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अत्यसंस्कार होणार आहेत. त्याअगोदर त्यांचे पार्थिव त्यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Horoscope Today : ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

माजी आमदार वल्लभ बेनके यांनी 20 वर्ष भुषविले. जुन्नर विधानसभेचे आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. 1985 ते 1995 आणि 2004 ते 2014 असं चार टर्म आमदार म्हणून वल्लभ बेनके यांची कार्यशैली चर्चेत राहिली. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून 10 वर्ष बेनके यांचे काम मोलाचे ठरले. आज सायंकाळी 4 वाजता हिवरे बुद्रूक या त्यांच्या जन्मगावी त्यांच्यावर अत्यसंस्कार होणार आहेत.

अमित शाह संभाजीनगरात फोडणार लोकसभेच्या प्रचाराचा नारळ, कुणाला मिळणार उमेदवारी?

बेनके हे पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या निधननंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

तसेच ते म्हणाले की, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वल्लभशेठ बेनके हे 1985 साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते, त्यानंतर 1990 मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले. वर्ष 2004 व 2009 मध्ये पुन्हा त्यांनी जुन्नर मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण पुणे जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या वल्लभशेठ बेनके यांच्या निधनामुळे आमदार अतुल बेनके आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आमदार अतुल बेनके आणि कुटुंबीयांच्या तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज