Chandra Mohan Passed Away: सुप्रसिद्ध अभिनेते चंद्रमोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Chandra Mohan Passed Away: ज्येष्ठ तेलुगू अभिनेते चंद्र मोहन (Chandra Mohan) यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. (Chandra Mohan Death)अनेक तेलुगू सिनेमात आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे चंद्र मोहन यांची आज (11 नोव्हेंबर ) प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे 82 व्या वर्षी निधन झाले आहे. ते पाच दशकांहून जास्त काळ तेलुगू मनोरंजनसृष्टीत सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रमोहन यांना हृदयविकाराच्या संबंधित आजारामुळे हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांना सकाळच्या सुमारास 9: 45च्या उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
John Bailey Passes Away : फिल्म अकादमीचे माजी अध्यक्ष जॉन बेली यांचे निधन
चंद्रमोहन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून टॉलिवूड मनोरंजनसृष्टी मोठ्या शोकसागरात बुडाली आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स आणि अनेक सेलिब्रिटी मित्र त्यांना श्रद्धांजली वाहत असल्याचे बघायला मिळत आहे. चंद्रमोहन यांच्या पश्चात पत्नी जालंधरा आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. अभिनेत्यावर सोमवारी हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी दिली आहे.