सख्खे मित्र बनले पक्के विरोधक! माजी IAS-IPS अधिकारी दोस्तांनी एकमेकांच्या विरोधात ठोकला शड्डू

सख्खे मित्र बनले पक्के विरोधक! माजी IAS-IPS अधिकारी दोस्तांनी एकमेकांच्या विरोधात ठोकला शड्डू

राजस्थान निवडणुकीत अनेक वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. कुठे पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर कुठे सख्ख्या भावांनी एकमेकांना आव्हान दिले आहे. राज्यातील बस्ती विधानसभेची जागा सध्या अशाच एका कारणामुले सर्वाधिक चर्चेत आहे. काँग्रेसने (Congress) या जागेवरून आयपीएस लक्ष्मण मीणा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने (BJP) निवृत्त आयएएस चंद्र मोहन मीणा यांना तिकीट दिले आहे. (Congress has given ticket to retired IPS Laxman Meena and BJP to retired IAS Chandra Mohan Meena from Basti constituency)

निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांनी माजी अधिकाऱ्यांना उमेदवारी देत आमनेसामने उभे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण या गोष्टीत याही पेक्षा विशेष बाब म्हणजे या दोन्ही उमेदवारांमध्ये वर्षानुवर्षे जुने नाते आणि अगदी जवळची मैत्री आहे. चंद्र मोहन मीणा आणि लक्ष्मण मीणा हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक तर आहेतच. पण चांगले मित्रही आहेत, दोघांची गावे जवळ आहेत. लक्ष्मण हे डुंगा भागातील सिया कबस गावचे रहिवासी आहेत तर चंद्र मोहन हे जयराम का बस गावातील रहिवासी आहेत. लक्ष्मण मीना वयाने थोडे मोठे आहेत. पण, दोघेही शाळेत एकत्र शिकले. त्यानंतर ते दोघेही एकत्र कॉलेजला गेले.

राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे? पुरावेच देतो; शिरसाटांचे थेट चँलेज

पुढे चंद्र मोहन हे 1980 मध्ये तर लक्ष्मण मीणा 1982 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण झाले अन् अधिकारी बनले. यानंतर लक्ष्मण मीणा यांनी 2009 मध्ये VRS घेऊन राजकारणात प्रवेश केला. तर चंद्र मोहन 2014 मध्ये निवृत्त झाले आणि त्यानंतर तेही राजकारणातही आले. चंद्र मोहन यांना 2015 ते 2019 या काळात राज्य सरकारमध्ये माहिती आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तिकीट मिळवले.

‘नगरमध्ये दुष्काळ जाहीर न करणं हे तर…’ : विखे-पाटलांच्या मुख्यमंत्रीपदावरुन रोहित पवारांना संशय

दोघांनी अनेकदा एकाच जिल्ह्यातही काम केले आहे :

यापूर्वी चंद्रमोहन आणि लक्ष्मण यांनी एकत्र कामही केले आहे. 1988 ते 1990 या काळात चंग्रमोहन जालोरमध्ये जिल्हाधिकारी होते तर लक्ष्मण जिल्हा पोलीस अधिक्षक होते. चंद्र मोहन 2000 ते 2002 पर्यंत बिकानेरचे जिल्हाधिकारी होते, त्याचवेळी लक्ष्मण मीना त्या काळात आयजी पदावर होते. आता दोघेही एकत्र निवडणूक लढवत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube