लालू पुत्राने पंगा घेतलाच! ‘या’ मतदारसंघातून अपक्ष लढणार, तेजप्रताप यादव यांची घोषणा

लालू पुत्राने पंगा घेतलाच! ‘या’ मतदारसंघातून अपक्ष लढणार, तेजप्रताप यादव यांची घोषणा

Bihar Assembly Elections 2025 : बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी (Bihar Assembly Elections 2025) समोर आली आहे. राष्ट्रीय जनता दलातून निलंबित केलेले तेजप्रताप यादव यांनी (Tej Pratap Yadav) आज एक मोठी निर्णय जाहीर केला. आगामी विधानसभा निवडणूक (Bihar Politics) महुआ या मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बिहारची राजधानी पटना येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या निर्णयाची माहिती दिली.

एएनआय वृत्तसंस्थेनुसार तेजप्रताप यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की टीम तेजप्रताप यादव लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मंच आहे. यावेळी चाचा (नितीशकुमार) मुख्यमंत्री होणार नाहीत. ज्या कुणाचं सरकार येईल जर त्यांनी युवकांना रोजगार, शिक्षण आणि आरोग्य या विषयावर काम करण्याचं आश्वासन दिलं तर मी त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभा राहिल. या निवडणुकीत मी महुआ या मतदारसंघातून नशीब आजमावणार आहे.

Bihar : मतदार यांद्यामध्ये मोठा घोळ, व्होटर लिस्टमध्ये नेपाळ, बांगलादेश अन् म्यानमारच्या नागरिकांची नावे

आता येत्या 31 जुलै रोजी महुला जाणार आहे. त्याठिकाणी एक भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या निवडणुकीत मी टीम तेजप्रताप या बॅनरखाली अपक्ष निवडणूक लढणार आहे. संपूर्ण बिहारमधून लोक या मोहिमेशी जोडले जात आहेत. या टीम अंतर्गत आणखीही काही उमेदवार निवडणुकीत उतरवले जातील असे यादव यांनी स्पष्ट केले. आता काही लोकांना त्रास सुरू होईल परंतु मला त्याने काही फरक पडत नाही. आमचं एकच उद्दीष्ट आहे ते म्हणजे बिहारला भ्रष्टाचार मुक्त सरकार देणे त्यासाठीच आम्ही आगामी काळात प्रयत्न करणार आहोत.

दरम्यान, तेजप्रताप यादव यांच्या घोषणेनंतर त्यांचे बंधू तेजस्वी यादव आणि राष्ट्रीय जनता दलात अस्वस्थता वाढली आहे. राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. खरंतर तेजप्रताप यादव यांना त्यांचे वडील बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव (Lau Prasad Yadav) यांनी पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. नंतर तेजप्रताप यांच्याशी सगळे संबंध तोडून टाकल्याचीही घोषणा केली होती. यानंतर प्रतिक्रिया देताना काही स्वार्थी लोक माझ्याबरोबर राजकारण करत आहेत असा आरोप तेजप्रताप यादव यांनी केला होता.

बिहार मतदार यादी पुनर्रचना : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला मोकळीक

follow us
  • fb
  • instagram
  • youtube