वेब सीरिजमधून भेटीला येणार आदिनाथ कोठारे; आगामी डिटेक्टिव धनंजय वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न

Adinath Kothare ने नव्या प्रोजेक्ट ची घोषणा केली होती. आदिनाथ लवकरच एका वेब सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Adinath Kothare

Adinath Kothare

Adinath Kothare will be seen in the web series; The muhurat of the upcoming Detective Dhananjay web series is over : बॉलिवुडमध्ये बड्या प्रोजेक्ट्सचा भाग होत असताना सध्या अभिनेता आदिनाथ कोठारे हा चर्चेत आहे. एकीकडे निर्मिती संस्था असलेल्या कोठारे व्हिजनची ” नशीबवान ” ही मालिका आणि आता पुन्हा सुरू होणार नवीन काम यात आदिनाथ व्यस्त असलेला दिसतोय. काही दिवसांपूर्वी आदिनाथ ने एक खास गिफ्ट प्रेक्षकांना देऊन नव्या प्रोजेक्ट ची घोषणा केली होती. आदिनाथ लवकरच एका वेब सीरिज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं देखील समजलं आणि त्याचा प्रोमो देखील समोर आला होता. या बहुचर्चित वेब सीरिज चा मुहूर्त नुकताच संपन्न झाल्याचं त्याने सोशल मीडिया वर सांगितलं.

टॅरिफ विरोधकांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांची खास योजना! अमेरिकन नागरिकांना देणार प्रत्येकी दीड लाख ‘टॅरिफ डिव्हिडंड’

झी 5 मराठी ओरिजनल अंतर्गत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेल्या डिटेक्टिव धनंजय मध्ये तो एका डिटेक्टिवच्या भूमिकेत बघायला मिळणार असून सोबतीला आदिनाथ या नव्या वेब सीरिजसाठी अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका बजावताना दिसणार आहे. मुंबईत “डिटेक्टिव धनंजय ” या वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न झाला आणि वेब सीरिजच्या शूटला सुरुवात झाली आहे. झी 5 वर ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

ठाकरेंची मशाल न घेता माजीमंत्री गडाख निवडणुकीच्या रिंगणात…हे आहे नव पक्ष चिन्ह

मराठी इंडस्ट्री मधली दोन मोठ्या निर्मिती संस्था एकत्र येऊन ” डिटेक्टिव धनंजय “ या वेब सीरिज ची निर्मिती करणार असून श्रीरंग गोडबोले यांची इंडियन मॅजिक आय आणि आदिनाथ कोठारेची स्टोरीटेलर्स नुक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बड्या निर्मिती संस्थांच्या माध्यमातून याची निर्मिती होणार आहे. गिरीश जोशी यांनी या सिरीज साठी स्क्रीनप्ले लिहिला असून. श्रीरंग गोडबोले निर्मितीसोबतच दिग्दर्शन करणार आहेत.

आजपासून नगरपरिषद, नगर पंचायतींसाठी अर्ज भरायला सुरूवात! असंख्य उमेदवार आजमावणार नशीब

डिटेक्टिव धनंजय या वेब सीरिज बद्दल पहिल्यांदा व्यक्त होताना आदिनाथ सांगतो ” प्रेक्षकांसाठी कायम वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स घेऊन येण्याकडे माझा कल असतो आणि प्रेक्षकांचं प्रेम मला कायम नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी भाग पाडत. डिटेक्टिव धनंजय मधून देखील काहीतरी खास घेऊन येणार आहोत हे नक्की ! कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर यांचं धनंजय हे पात्र या वेबशो मधून उलगडणार असून निर्माता आणि अभिनय या दोन्ही भूमिका यासाठी करणार आहे आणि मला याची फार उत्सुकता आहे. ओटीटी विश्वात काहीतरी वेगळं हटके घेऊन येण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहेत”

कुणाला धनलाभ तर कुणाला खरेदीचे योग कसं आहे 10 नोव्हेंबरचं राशीभविष्य?

एकीकडे अभिनेता म्हणून सुरू असलेला आदिनाथचा प्रवास तर दुहेरी भूमिका बजावत कायम उत्तम कलाकृतीची निर्मिती करून प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स तो देतोय. येणाऱ्या काळात देखील आदिनाथ रामायण, गांधी सारख्या अनेक बड्या बॉलिवूड प्रोजेक्ट्सचा मोठा भाग होणार आहे.

Exit mobile version