Adinath Kothere will meet the audience through a mystery web series Detective Dhananjay : नवीन वर्षाच्या सुरुवातीला निर्माता अभिनेता आदिनाथ कोठारेची सध्या सुरू असलेली “नशीबवान” मालिका अव्वल ठरली. मालिका विश्वात नंबर 2 वर असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय आणि म्हणून ही मालिका चर्चेत आहे पण इथेच न थांबता 2026 वर्ष हे आदिनाथसाठी नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट्सच ठरणार असल्याचं कळतंय. अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर झळकणारा आदिनाथ या वर्षात अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्सचा भाग होणार असल्याच्या चर्चा आहेत.
पौराणिक कथा, गुन्हा आणि न्याायची सरमिसळ! ZEE 5 ची आगामी सिरीज देवखेळचा ट्रेलर प्रसिद्ध
चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन असो किंवा अभिनय कायम उत्तम काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आदिनाथ या वर्षी ओटीटी पासून रुपेरी पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. बहुआयामी भूमिका साकारून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी आदिनाथ सज्ज होताना दिसतोय. ओटीटी विश्वात या आधी आदिनाथचा कधी ही न पाहिलेला लूक प्रेक्षकांना बघायला मिळणार असून तो एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार असून “डिटेक्टिव्ह धनंजय” या मिस्ट्री वेब सीरिज मध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आता ही मिस्ट्री आणि रहस्यजाल कधी उलगडणार हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे.
‘दो दीवाने सहर में’ मधील प्रेममय गाणं ‘आसमा’ काही तासांत येणार प्रेक्षकांच्या भेटीला !
ज्या प्रोजेक्टने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे असं बहुचर्चित “रामायण” हा चित्रपट वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आदिनाथ यात “भरत” ही भूमिका साकारताना दिसणार आहे. रामायणातील भरत ही व्यक्तिरेखा आदिनाथ कशी साकारणार? त्याचा लूक काय असणार? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. “बेनं” हा आगळा वेगळा विषयावर आधारित असलेला मराठी चित्रपट आदिनाथ करणार असून आजवरच्या त्याचा भूमिका पेक्षा यात तो वेगळ्या अंदाजात नवी गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “बेनं” चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारताना दिसणार असून अभिनेता आणि निर्मिती या दोन्ही भूमिका तो पार पाडणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट अनेक फिल्म फेस्टीवल मध्ये देखील दाखवण्यात येणार असल्याचं कळतंय. “बेनं” हा चित्रपट फिल्म फेस्टिवल फिरून आल्या नंतर चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
29 पालिकांच्या महापौरपदाचे भवितव्य आज ठरणार: मंत्रालयात थोड्याचवेळात आरक्षणाची सोडत
या सगळ्या बद्दल बोलताना आदिनाथ सांगतो “प्रेक्षकांचं प्रेमच माझी खरी ताकद आहे. 2026 मध्ये वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या भूमिका आणि मनापासून केलेलं काम तुम्हाला दिसेल” एकंदरीत या वर्षात आदिनाथ हा बड्या स्टार्सच्या सोबतीने बिग बजेट प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होणार असून हंसल मेहता यांच्या “गांधी” या वेब सीरिज मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. गांधी बद्दल ची उत्सुकता प्रेक्षकांना असताना ” झपाटलेला 3 ” या चित्रपटाचं शूटिंग सुद्धा या वर्षात तो कळणार असल्याचं कळतंय.
कल्याण-डोंबिवलीत महापौर कोणाचा? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी दिले मोठे संकेत…
ओटीटी, चित्रपट, मालिका या तिन्ही विश्वात वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आदिनाथ अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स या वर्षात करणार असून अजून तो कुठल्या भूमिकांमध्ये झळकणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
